महाशिवरात्री स्पेशल वर्षा रेसिपी – भाग सहावा
उपवासाचा रताळे,बटाट्याचा कीस
साहित्य : पाच सहा मध्यम आकाराची रताळी, पाच-सहा तिखट हिरव्या मिरच्या, खमंग भाजलेल्या एक छोटी वाटी शेंगदाण्याचा खलबत्यात ठेचलेला शेंगदाण्याचा जाडसर कूट ,साजूक तूप, साखर हवी असेल तर अर्धा चमचा साखर, बारीक दळलेले मीठ. ( आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये दोन बटाटे किसून टाकले तरी चालू शकतात ).
कृती : रताळे किसून घ्यावे. हिरवी मिरची मिक्सरच्या छोट्या भांड्यात बारीक करून घ्यावी .तुम्हाला बटाटा टाकायचा असेल तर रताळ्याच्या कीस मध्येच बटाटाही किसून टाकावा. किसलेल्या रताळ्याच्या बटाट्याच्या कीस मध्येच वाटलेली हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ मिक्स करून घ्यावी. कढईमध्ये तूप टाकून रताळ्याच्या बटाट्याच्या कीस मध्ये वाटलेली मिरची ,मीठ आणि अर्धा चमचा साखर मिक्स करून घ्या.नंतर ते सर्व कढईमध्ये तुपात टाकून गॅस बारीक करून झाकण ठेवून वाफेवर चांगले परतू द्या. गरज असेल तरच हाताने पाण्याचा शिपका मारावा आणि वाफेवर चांगले शिजू द्यावे. तयार झालेला बटाटा,रताळ्याचा किस खायला अतिशय छान व सुंदर लागतो.

श्रीमती वर्षा नाईक,सामाजिक कार्यकर्त्या
धनकवडी, पुणे


