महाशिवरात्री वर्षा स्पेशल रेसिपी – भाग पाचवा
बटाटा आणि अख्ख्या शेंगदाण्याची उपवासाच्या भाजी
साहित्य : स्वच्छ धुतलेले पाच-सहा बटाटे, सहा- सात तिखट मिरच्या,अख्खे शेंगदाणे दीड ते दोन वाट्या, साजूक तूप,बारीक दळलेले मीठ चवीप्रमाणे
कृती : बटाटे स्वच्छ धुऊन उकडून घ्यावेत. अख्खे शेंगदाणे मीठ टाकुन उकडून घ्यावेत. हिरवी मिरची मिक्सरवर बारीक करून घ्या. सोललेले बटाटे आपण बारीक फोडी करतो तेवढ्या प्रमाणात हाताने कुस्करून घ्या. कढई मध्ये तूप टाकून मिक्सरवर बारीक केलेली हिरवी मिरची तुपामध्ये परतून घ्या. त्यामध्ये हाताने कुस्करलेला बटाटा आणि शेंगदाणे तुपामध्ये चांगले परतून घ्या. नंतर चवीनुसार बारीक मीठ टाका. अशाप्रकारे केलेली बटाटा शेंगदाण्याची उपवासाची भाजी खूप चवदार लागते.

श्रीमती वर्षा नाईक,सामाजिक कार्यकर्त्या
धनकवडी पुणे.
धनकवडी पुणे.