समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – एकाच सामान नावाच्या दोन व्यक्ती गावात वास्तव्यास असल्याने यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाची नोंद गावातील त्याच सेम नावाच्या जिवंत असणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर लावण्याचा अजब प्रकार त्या गावातील तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून झाल्याची माहिती पिंपरखेड ता.शिरूर येथील पिडीत शेतकरी बाळू बाबू बोंबे यांनी आज दि. २४ ला सा.समाजशील शी बोलताना दिली.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे एकाच सारख्या नावाचे दोन शेतकरी असून त्यातील एक शेतकरी हे मयत झालेलेआहेत.मयत शेतकऱ्याच्या कायदेशीर वारसानी वारस नोंद करण्याठी महसूल विभागाकडे अर्ज सादर केला होता. मयत शेतकरयाचा मिळकत गट नंबर २६० असून वारस नोंद करण्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ त्याच गटाचा समावेश असताना देखील नावात साम्य असलेल्या नावाच्या दुसन्या शेतकर्याच्या मिळकत नंबर.२६२ गट क्रमांकाचा काहीही उल्लेख व संबंध नसताना वारसनोंद केली आहे. मात्र मयत व्यक्तीच्या वारसांनी सादर केलेल्या अर्जात केवळ मयत शेतकऱ्याच्या नावे असलेला मिळकत शेतजमीन गट नंबर समाविष्ट केला होता. मात्र तत्कालीन तलाठी तसेच मंडलाधिकारी यांनी वारस नोंद अर्जाची योग्य पाहणी व योग्य शहानिशा न करताच नावात साम्य असलेल्या जिवंत असलेल्या त्याच नावाच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या गट क्रमांकावर मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांची नोंद घातलेली आहे. असे बोंबे या शेतकऱ्याने कागदपत्रांसह पत्रकार शेटे यांना माहिती दिली. या बाबत महसूल विभागाच्या या विभागाच्या प्रांत अधिकारी अहिरे यांना वरिष्ठ पत्रकार तथा युवा क्रांती राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. सुभाष शेटे यांनी माहिती देत संबंधित शेतकऱ्याला होत असलेल्या नाहक त्रास व मनस्तापाबद्दल माहिती दिली.
पूनम अहिरे – प्रांत अधिकारी,पुणे
– शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बाळू बाबू बोंबे या हयात असलेल्या शेतकऱ्याच्या सातबारावर मयत झालेल्या त्याच नावाच्या वारसांची नोंद झालेली आढळून येत असून आगामी ३ दिवसांत हे प्रकरण निकाली काढून नक्कीच मार्गी लावले जाईल.
मधुरा रेसीपी – भाग – तिसरा
वाफेवर शिजवलेले भरलेले खारे वांगे
अर्धा किलो मध्यम आकाराची काटेरी वांगे, छोटी अर्धा वाटी सुके खोबरे,पाच-सहा हिरव्या तिखट मिरच्या,आले, एक मोठी कांडी लसूण,कोथिंबीर, धने पावडर एक चमचा, जिरा पावडर एक चमचा आणि चवीनुसार मीठ.
कृती : सुके खोबऱ्याची वाटी एका जाड तारेमध्ये खोचून बारीक गॅसवर चांगले भाजून घ्यावे हिरव्या मिरच्या तव्यामध्ये थोडेसे तेल टाकून थोडेसेच तळून घ्या. भाजून घेतलेल्या खोबऱ्याचे काळे थोडे खरवडून काढावे त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे.आता भाजलेले खोबरे,तळलेल्या मिरच्या,आले,लसूण, कोथिंबीर, धना पावडर, जिरा पावडर हे सगळे मिक्सरवर छोट्या भांड्यात पाणी न टाकता बारीक करून घ्यावे. हा मसाला एका ताटलीत काढून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे आणि हा मसाला वांग्यां मध्ये भरून घ्यावा.कढईमध्ये तेल, हळद ,हिंग टाकून वांगी चांगली परतवून घ्यावी. एकदम बारीक गॅस करून वांग्यामध्ये पाणी न टाकता कढईवर झाकण ठेवून नुसत्या वाफेवर ही वांगी शिजवून घ्यावी.गरज असेल तरच दोन छोटे चमचे पाणी टाकावे.बारीक गॅस करून नुसत्या वाफेवर शिजवलेली ही वांगी अतिशय चविष्ट लागतात.

मधुरा रेसिपी – भाग चौथा
भरलेली मसाला वांगी
आठ काटेरी माध्यम आकाराची वांगी, चार माध्यम आकाराचे कांदे, अर्ध्याची निम्मी सुक्या खोबऱ्याची वाटी,आले, लसुन एक कांडी, कोथिंबीर एक वाटी, तळलेले शेंगदाणे पाऊण वाटी, दोन चमचे सुहाना कांदा लसूण मसाला,अर्धा चमचा लाल मिरची पावडर, जिरे एक चमचा,धना पावडर एक चमचा, चवीपुरते बारीक मीठ.
कृती : खोबऱ्याचे बारीक तुकडे करून तेलामध्ये खमंग तळून घ्या. त्यानंतर शेंगदाणे बारीक गॅसवर खमंग तळून घ्या. चार माध्यम आकाराचे कांदे चिरून थोड्याशा थोडेसे लालसर वर तळून घेणे.आता एका ताटलीमध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर वेगळे एका ताटलीमध्ये एकत्र करून काढून ठेवणे. तळलेले खोबरे, कांदा,आले, लसूण ,कोथिंबीर, आणि धने जिरा पावडर हे सर्व मिक्सरच्या छोट्या भांड्यात पाणी न टाकता एकदम बारीक करून घेणे.आता तळलेल्या शेंगदाण्याच्या साली काढून टाकून मिक्सरवर बारीक न करता खलबत्त्यात बारीक ठेचून घ्या. शेंगदाणे फारच बारीक पण करू नये. हा वाटलेला मसाला एका ताटलीमध्ये काढून घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट,चवीनुसार मीठ आणि आपण जो एका ताटलीमध्ये कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर मिक्स करून काढले आहे त्यातला निम्मा कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर वाटलेल्या मसाल्यामध्ये टाका आणि निम्मा तसाच ठेवून द्या.आता वांगी स्वच्छ धुऊन वांग्याला मधून दोन चिरा पाडून चार भाग करावे त्यामध्ये वाटलेला मसाला भरावा.आता कढईमध्ये तेल टाकून हळद,हिंग टाकावे त्यामध्ये भरलेली वांगी सोडावी. भरलेली वांगी चांगली परतून झाली की निम्मा राहिलेला कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर वरतून टाकावी पुन्हा वांगे चांगले परतावे झाकण ठेवून गॅस बारीक करावा.थोड्यावेळाने त्यात एक ग्लास भरून पाणी टाकावे आणि वांगी चांगली शिजू द्यावी.वांगी चांगली शिजली की गॅस बंद करावा ही आहे ही भरलेली मसाला वांगी अत्यंत स्वादिष्ट लागतात.
श्रीमती वर्षा नाईक,सामाजिक कार्यकर्त्या
धनकवडी पुणे.