सरकारची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेत आपल्या शेतीतील विहीर,बोअरवेल वर सौर कृषी पंप बसवून किमान दिवसभर शेतीला पाणी कसे देता येईल याची सोय केली आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई चे शेतकरी असलेले पत्रकार समाजशील न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक देवकीनंदन शेटे यांनी देखील आपल्या शेतीतील विहिरीवर नुकताच सौर कृषी पंप बसविला असून वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतातील पिकांना विहिरीत पाणी असून ही पाणी देणे त्यांना मुश्किल होत होते.अनेकदा दिवसा थ्री फेज वीज पुरवठा मिळत नाही.मिळाला च तर तोही कमी दाबाने अनेकदा तर वारंवार वीज पुरवठा ता तासनतास बंद राहत असतो. अशा वेळी शेतीला पाणी देणे अवघड होऊन बसते.आता शेतीत सौर कृषी पंप बसविल्याने ऐन उन्हाळ्यात वीज जरी उपलब्ध नसली तरी किमान सकाळी नऊ ते सायंकाळी सूर्यास्त होई पर्यंत शेतीला सौर कृषी पंपाद्वारे सुरळीत पाणी देता येणार असल्याचे पत्रकार शेटे यांनी सांगितले. आज या सौर कृषी पंपाच्या प्रारंभ प्रसंगी सेवा निवृत्त पोलीस अधिकारी वसंत बापू उघडे,कास्तळू शेतकरी आदिनाथ रोहिले उपस्थित होते.
मधुरा रेसीपी – भाग – पहिला
कृती : चावी नुसार हिरवी मिरची,आलं,लसूण,कोथिंबीर,खोबर अगदी छोटासा एकच कांदा चिरून घ्या. मिक्सरच्या छोट्या (चटणीच्या) भांड्यात थोडेसे पाणी टाकून त्यात कृतीतील सर्व मिश्रण एकदम बारीक मसाला करून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून फक्त हळद टाका.मोहरी जिरे टाकू नका.तेलामध्ये फक्त हळद आणि हिंग टाकून अर्धा किलो गोड सोललेला ओला हिरवा मटार, बटाटा खूप छानसा परतवून घ्या. नंतर वाटलेले वाटण त्याच्यात चांगले परतवून घ्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून भाजी शिजवून घ्या. भाजी शिजत आली की पाच मिनिटे आधी टोमॅटो कापून टाकने. टोमॅटो थोडा शिजला की गॅस बंद करून टाकने. ही भाजी जेवताना ताटात घेतली की थोडा लिंबू पिळून खाल्ली की खूप सुंदर लागते.
कृती : ओला नारळ अर्धी वाटी आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये छोट्या भांड्यात पाणी न टाकता नुसता फिरवून घ्यावा. वेगळी आले नसून ची पेस्ट घरात केलेली असली तर ठीक नसेल तर आले लसूण सुद्धा ओल्या खोबऱ्या बरोबर आणि मिरची बरोबर फिरवून घ्यावे. मिक्सरवर हे सर्व बारीक करताना मसाल्यात पाणी टाकू नये. कढईमध्ये थोडे तेल टाकावे, तेलामध्ये फक्त हळद, हिंग टाकावे नंतर त्यात ओले मटार टाकून चांगले परतून घ्या. कढईत मटार चांगला परतला की मिक्सरवर यार केलेले ओले खोबरे मिरची आलं लसूण चे वाटण कढईत टाकावे व चांगले परतावे ही भाजी बारीक गॅस करून नुसत्या वाफेवर बारीक शिजवावी. गरज लागली तरच अगदी थोडेसे पाणी टाकावे पण भाजी पूर्ण कोरडी करावी ही भाजी खूप चवदार व स्वादिष्ट लागते.


धनकवडी पुणे.