दुचाकीवर मागे बसलेल्या अपंग तरुणावर बिबट्याचा हल्ला – तरुण गंभीर जखमी – सविंदणे – लोणी मार्गावरील घटना 

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई येथील गणेश दत्तात्रय मुखेकर हे आपल्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलाला आणायला त्यांचा दुचाकी चालवत असलेला मित्र दत्तात्रय इचके यांच्या बरोबर सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान सविंदणे मार्गे लोणी ता.आंबेगाव जि.पुणे येथे चाललेले असताना रानमळा नजीक रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या एका मोठ्या बिबट्याने ‌दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या गणेश मुखेकर यांच्या पायावर हल्ला केल्याने ते या घटनेत गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱा ‌गणेश मुखेकर यांचा मुलगा सुरज सुट्टी निमित्त घरी‌ येण्यासाठी पी एम टी ने लोणी येथे आला होता. त्याला आणण्यासाठी लोणी येथे जात असताना कवठे येथील शेतकरी गणेश दत्तात्रय मुखेकर ‌व त्यांचा मित्र दत्तात्रय इचके ‌दुचाकी घेऊन जात होते. ‌त्यावेळी रात्री  साडे आठच्या‌ सुमारास रानमळा येथे ‌ बिबट्याने अंधारात त्यांच्या धावत्या दुचाकी वर हल्ला करत गणेशाच्या पायाला पंजा मारत गंभीर जखमी केले. त्याही परिस्थितीत दुचाकीस्वार दत्तात्रय इचके यांनी गाडी मोठ्या धाडसाने दामटली. त्यामुळे बिबट्याच्या या हल्ल्यातून ते दोघे ही थोडक्यात बचावले. म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
इचके यांनी गाडी ‌न थांबविता लोणी गाठले व तेथील एका खाजगी रुग्णालयात‌ मुखेकर यांच्यावर ‌ प्राथमिक उपचारासाठी ‌ दाखल केले. परंतु ‌ मुखेकर यांच्या पायावर‌ बिबट्याने आपल्या पंजाच्या नखाने‌ गुडघ्यापासून  खाली खोलवर वार केल्याने‌ मोठी जखम झाली. त्यामुळे येथील डॉक्टरांनी पुढील ‌उपचारासाठी मंचर येथे जाण्याचा सल्ला दिला‌. ही माहिती वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना‌ कळविल्यानंतर ‌त्यांनी ‌मुखेकर यांना तातडीने मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास ‌उपचारासाठी दाखल केले. या घटनेने परिसरात‌ बिबट्याची प्रचंड ‌दहशत पसरली आहे.या अगोदर ही याच परिसरात बिबट्याने चालत्या दुचाकीवर हल्ला करण्याच्या काही घटना घडल्या असल्याचे दत्तात्रय नानाभाऊ सांडभोर,नितीन बाळू मुखेकर यांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले.
‌ या तरुणाची आर्थिक ‌परस्थिती बेताची असल्याने व तो अपंग असल्याने वन खात्याकडून या तरुणाला योग्य उपचार व आर्थिक मदत मिळावी अशी मागणी युवा करणं फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,पत्रकार प्रा.सुभाष शेटे व कवठे येमाई येथील ग्रामस्थांनी केली आहे.
  अमोल सातपुते – उप वन संरक्षक,जुन्नर,पुणे  
कवठे येमाई येथील तरुणावर बिबटने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.सदर तरूणाला उपचारासाठी येणारा सर्व खर्च शासन नियमाप्रमाणे करण्यात येईल. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी प्रकरणात जखमी व्यक्तीला पाच लक्ष रुपये मदत देण्याचे शासनाचे प्रावधान असून किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीचा औषधे व उपचाराचा खर्च वन विभागामार्फत करण्यात येतो. सदर अपंग जखमी तरुणास शक्य तो मदत देण्याचा प्राधान्याने प्रयत्न करण्यात येईल.  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds