शिरूर तालुक्याच्या राजकीय विद्यापीठाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही भुरळ – माजी आमदार गावडेंची घेतली स्नेहपूर्व भेट   

551

समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक – शिरुर तालुक्याच्या राजकारणातील विद्यापीठ अशी ओळख असलेले माजी आमदार पोपटराव गावडे तब्बल ६२ वर्षापासून जिल्हाच्या व राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.यशवंतराव चव्हाण साहेबां पासून विद्यमान मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस या सर्वांची राजकीय राजवट गावडे साहेबांनी जवळून अनुभवली.अनेक राजकीय घडामोडींचे साक्षीदार असलेले माजी पोपटराव गावडे म्हणजे प्रचलित राजकारणातील चालते – बोलते विद्यापीठच असल्याचे पाहावयास मिळते.
आता हेच पाहा ना कोपर्डी येथील दुर्दैवी निर्भयाच्या बहिणीच्या विवाहा निमित्ताने राज्याचे  मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस माजी आमदार पोपटराव गावडे यांची जन्मभुमी असलेल्या टाकळी हाजी गावात आले.राज्याच्या समाज जीवनात खळबळ उडवून देणाऱ्या कोपर्डीच्या दुदैवी घटने नंतर संवेदनाशील मनाच्या फडणवीस साहेबांनी पिडीत कुटुंबा शी सातत्याने संवाद ठेवला निर्धारीत वेळेत आरोपी गजाआड करुन कायदेशीर प्रक्रिया सुरु केली.ही घटना घडली त्या  काळात राज्याचे नेतृत्व देवाभाऊ करत होते. संपुर्ण राज्यात आंदोलनाचे लोण पोचले होते.समाजमाध्यमा पासून राजकीय स्तरावर ही फडणवीस यांच्या वर विविध प्रकारचे द्वेष आरोपांची राळ उठवली जात होती.माञ या सर्व प्रसंगाचा ध्यर्याने सामना करत फडणवीस यांनी कणखर प्रशासक कसा असावा याचा वस्तूपाठ राज्याला त्यावेळी दाखवून दिला. कोपर्डीच्या दुदैवी निर्भयाच्या कुटुंबातील प्रत्येक घटकाशी मागील तब्बल आठ वर्षापासून सातत्याने संवाद ठेवून संवेदनशीलतेचा प्रत्यय देवा भाऊंनी  दिला.
विवाह निमित्ताने टाकळी हाजी येथे आलेल्या फडणवीस यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या बरोबर दिलखुलास गप्पा मारल्या.शिरुर तालुक्या पासून राज्याच्या राजकारणातील बदलत गेलेले संदर्भ जाणून घेत विद्यमान विधान सभेतील नव्याने आकाराला आलेले सामाजिक समिकरणे, त्याचा महायुतीला झालेला फायदा विशेषतः ओबीसी जातसमुहाने फडणवीस यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास या सारख्या असंख्य मुद्दा वर दोन्ही नेत्या मध्ये मनमुराद चर्चा झाली.माजी आमदार पोपटराव गावडे यांची तब्बल ६२ वर्षाची सार्वजनिक,राजकीय जीवनातील वाटचाल ही अतिशय प्रेरणादाई असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले. मुख्यमंत्री फडणवीस व पोपटराव गावडे यांनी काही काळ विधानसभेत एकञ काम केले आहे. त्याही काळातील जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ काढून मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाकळी हाजी येथील गावडे हवेली मध्ये चहापान स्विकारुन आजही पोपटराव गावडे यांचे महाराष्ट्र च्या राजकारणातील स्थान आधोरेखित केले हे माञ नक्की.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds