शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – सरकारची मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना वरदान ठरणार असली तरी या योजनेतून सौर पंप मिळावेत म्हणून अर्ज व अश्वशक्ती मागणी प्रमाणे त्याची फी भरणाऱ्या हजारो शेतकऱयांना अर्ज पूर्ण भरताना व्हेन्डर सिलेक्शन हा पर्याय उपलब्ध होत नसल्याने अडचण येत असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. यावर संबंधित यंत्रणेने तात्काळ व जलदगतीने योग्य त्या उपाय योजना राबवून सौर कृषी पंपांसाठी पैसे भरून ही व्हेंडर सिलेक्शन हा पर्याय उपलब्ध होत नसल्याने तो पर्याय तात्काळ उपलब्ध करून या योजनेत पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जलद गतीने सौरपंप बसवून देत दिलासा देण्याची मागणी राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुभाष शेटे यांनी सा.समाजशील शी बोलताना केली आहे.
याबाबत अधिक माहिती साठी महावितरणच्या बारामती विभागाचे मुख्य अभियंता म्हसू मिसाळ,उप कार्यकारी अभियंता भाग्यवंत,शिरूर चे महावितरणचे कार्यकारी अभियंता सुमित जाधव यांच्याकडे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज,पैसे भरून ही येत असलेल्या व्हेंडर सिलेक्शन पर्यायाच्या अडचणी बाबत पत्रकार शेटे यांनी सविस्तर माहिती घेतली. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत अनेक शेतकरी अर्ज पैसे भरून सहभागी झाले असून एकट्या शिरूर कार्यालया अंतर्गत सुमारे १००० शेतकऱ्यांनी पैसे,अर्ज भरून व्हेंडर सिलेक्शन पर्याय उपलब्ध होत नसल्याने ते प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळाली. तर पूर्वी सुरु असलेली कुसुम योजना बंद झाली असून आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतूनच प्राधान्याने सौर पंप दिले जाणार असल्याचे व लवकरच व्हेंडर सिलेक्शन हा पायरी उपलब्ध होईल व त्यानंतर त्या अर्जांची छाननी होऊन क्रमानुसार अर्जदार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसविण्यासाठी प्राध्यान्य देण्यात येणार असल्याचे बारामती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत तर महावितरणच्या बारामती मंडळ अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ४,२०० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून त्यातील फक्त ८६८ शेतकऱ्यांनीच सौर पंप अश्वशक्ती प्रमाणेच पैसे भरले असल्याचे ही भागवत यांनी सांगितले.जे शेतकरी या योजनेत सहभागी इच्छित आहेत ज्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी सौर पंपअश्वशक्ती प्रमाणे पैसे भरण्याचे आवाहन ही भागवत यांनी केले आहे. तर शिरूर तालुक्यातून सुमारे १००० शेतकऱयांनी मागेल त्याला सौर पंप योजनेत अर्ज दाखल केले असल्याची माहिती महावितरणचे शिरूचे कार्यकारी अभियंता सुमित महाजन यांनी सा. समाजशील शी बोलताना दिली.शिरूर तालुक्यात असलेले मोठे बागायती क्षेत्र,तालुक्याच्या सर्वच भागात असलेली बिबट्यांची दहशत पाहता या योजनेत अधिक शेतकरी सहभागी होताना दिसत आहेत.बिबट्यांच्या दहशतीने शेतकऱ्यांना अनेकदा रात्री वीज असून असून ही केवळ भीतीपोटी शेतीस पाणी देणे अशक्य होत आहे. त्या करीता संबंधित यंत्रणेने या योजनेनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना येत असलेल्या त्रुटी तात्काळ दूर करून शिरूर तालुक्यातील अर्ज केलेल्या,पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अश्वशक्ती मागणी प्रमाणे सौर कृषी पंप बसवून देण्याची मागणी राष्ट्रीय किसान मंच च्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुभाष शेटे यांनी केली आहे.जेणे करून सौर पंपाद्वारे शेतकऱ्यांना शेतीतील पिकांना दिवसा पाणी देणे नक्कीच सर्वबाजूनी फायदेशीर ठरेल. त्या करीता सरकारने ही योजना अधिक गतिमान करणे गरजेचे असल्याचे ही शेटे यांनी म्हटले आहे.