शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथील दत्तात्रय सदाशिव दहितुले यांचे आज दि.७ ला सकाळी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ६० वर्षांचे होते.त्यांच्या पश्च्यात पत्नी,दोन मुले,सुना असा परिवार आहे.दहितुले हे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते.



