श्रीक्षेञ नारायण पुर (ता पुंरदर) येथे श्री दत्त जयतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

100
समाजशील न्यूज नेटवर्क ,शिक्रापूर,शिरूर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेञ नारायण पुर येथे श्री दत्त जयंती उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी पञकात दिली आहे .१३ डिंसेबर १५ ते डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम होणार असून या मध्ये आजोळ ज्योत स्वागत .चार वाजता २०० कोटी शिवदत्त नाम यज्ञ.श्री दत्त मंदिर येथे आरती .दुसऱ्या दिवशी दिंड्याचे भव्य स्वागत.श्री दत्तजन्म सोहळा व सुंटवडा,महाप्रसाद तर तिसऱ्या दिवशी पहाटे रुद्रआभिषेक,श्री दत्त महाराजांचा पालखी सोहळा, ग्रामप्रदक्षणा व दुपारी दोन च्या पुढे प्रवचन,आरती महाप्रसाद असे विविध कार्यक्रम तीन दिवसात होणार आहेत. हा कार्यक्रम परमपुज्य श्री श्री नारायण महाराज (अण्णा ) यांच्या कृपा आशिर्वादाने परमपूज्य श्री टेंबे महाराज यांच्या आधिपत्याखाली संपन्न होणार आहे .तरी या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी जास्त बहुसंख्यने उपस्थित राहावे असे आवाहन श्री दत्त सेवकरी मंडळ श्रीक्षेञ नारायणपुर यांनी केले आहे .



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds