शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : प्रा. नुरमहमद बाबू मुल्ला यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने भोसरी (पिंपरी – चिंचवड) येथे झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा.एन.बी.मुल्ला यांना शैक्षणीक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संपादक संजय आवटे, मुंबई मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष रामदास थिटे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी पडवळ, सचिव सुबोध गलांडे, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, सचिव शिवाजी कामथे, प्राचार्य अशोक सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.एन. बी.मुल्ला यांचे या पुरस्काराबद्दल विद्यालयाचे प्राचार्य आर.एन.सानप, पर्यवेक्षक बाळासाहेब जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
प्रा .एन.बी.मुल्ला यांना जिल्हास्तरीय ‘ गुणवंत शिक्षक ‘ पुरस्कार प्रदान
BySamajsheelOctober 12, 20240
102
Previous Postकवठे येमाईत भीमाशंकर कारखान्याकडून साखर वाटप सुरु - ५०,२७० किलोचे २० रुपये दराने वाटप
Next Postजेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांची युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकारसंघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड