समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि महिला जनजागृती,युवक,युवती संघटन चळवळीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुणे,धनकवडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा श्रीमती वर्षाताई नाईक यांना सन २०२६ चा “उत्कृष्ट संघटन पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी ही माहिती सा.समाजशील शी बोलताना दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून वर्षाताई नाईक या युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून महिला,युवती,युवकांचे संघटन बांधणे, शहरी,ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना मार्गदर्शन करणे, सामाजिक उपक्रम राबवणे तसेच विविध जनजागृती कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक गतिमान झाले असून अनेक युवती,युवक,महिला संघटनेशी सक्रियपणे जोडले गेले आहेत.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षाताई नाईक यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. “त्यांचे कार्य संघटनेसाठी प्रेरणादायी असून भविष्यात ही त्या संघटनेची धुरा समर्थपणे सांभाळतील,” असे मत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.हा पुरस्कार लवकरच शिर्डी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या संघटनेच्या चोथ्या विशेष कार्यक्रमात वर्षाताई नाईक यांना मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.वर्षाताई यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

