समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे गावात असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या समोरील चौकात पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलन आज दि. ०२ ला सायंकाळी ६ ला मोठ्या उत्साहात पार पडले. अनेक,गावकरी, युवक कार्यकर्ते, महिला-भगिनी व लहान मुले मोठ्या संख्येने होळीच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
होळी प्रज्वलन पूर्वी श्री मारुती मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळी पेटवून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यात आला. यावेळी “होळी की जय” च्या घोषणा देत परिसर आनंदमय वातावरणात दुमदुमून गेला.भाविकांनी होळी निमित्त श्रद्धेने गौऱ्या,पूजासाहित्य घेऊन,नैवेद्य दाखवत परंपरेप्रमाणे एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला.आज पौर्णिमा असल्याने गावचे ग्रामदैवत श्री येमाई देवीचा पालखी सोहळा रात्री आयोजित करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येथे श्री हनुमान मंदिर परिसरात होळी उत्साहात प्रज्वलित
BySamajsheel NewsMarch 2, 20260
Previous Postयुवा क्रांती पोलिस मित्र संघटनेच्या वर्षाताई नाईक यांना २०२६ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटन पुरस्कार जाहीर
Next Postपाचवी तील मुलीच्या छेडछाड प्रकरणी सविंदणे हायस्कुल मधील शिक्षकावर गुन्हा दाखल : तर शिक्षकाला बेदम मारहाण प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल
