गाथा व ज्ञानेश्वरी ग्रंथाची हस्त लिखित स्वरूपात ३ वर्षात निर्मिती; कवठे येमाईचे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता कोंडीराम इचके यांचा आगळावेगळा उपक्रम 

228
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती व संकल्पित कार्य जिद्दीने पूर्णत्वाकडे नेण्याचा मानस असला की ते कार्य पूर्णत्वाकडे जाते च. असाच एक प्रत्यय व अनुभव पाहावयास मिळाले तो म्हणजे शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या इचकेवाडीत वास्तव्यस असणारे शासनाच्या जल संपदा विभागातून उपकार्यकारी अभियंता पदावरून निस्वार्थपणे सेवा करीत सेवानिवृत्त झालेले व त्यानंतर केवळ समाजसेवा,प्रभोधन व पारमार्थिक सेवेत लिन झालेले हभप कोंडीराम तानाजी इचके यांनी मागील ३ वर्षापूर्वी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी व संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांची गाथा हे दोन ग्रंथ स्वतःच्या हस्ताक्षरात लिखित स्वरूपात उतरविण्याचा संकल्प केला.व नुकतीच त्या दोन्ही हस्तलिखित ग्रंथांचे लिखाण पूर्ण झाले.व आज दि. २२ ला त्यानिमित्ताने इचके कुटुंबीयांनी हस्तलिखित ग्रंथांचे विधिवत पूजन,श्री सत्यनारायण महापूजा,महाप्रसाद,जागरण गोंधळ या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.सेवा निवृत्त झालेले कोंडीराम इचके यांनी २२ वर्षे पंढरीची पायी वारी केली. आज वयाची ६८ वर्षे सुरु असताना देखील मागील तीन वर्षांपासून येथील घोडनदी किनारी असलेल्या ऐतिहासिक श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात एकांतात व अखंडपणे बसत या दोन्ही हस्तलिखित ग्रंथांची निर्मिती केली. याच बरोबर गावरान गायी अंगनी का असावी याचा सखोल अभ्यास करून याच इचके कुटुंबाने आपल्या घरा बाजूकडील गोठ्यात सुंदर अशी खिल्लार (गावठी) गाय व तिचे वासरू जीवापाड सांभाळली आहे.
या कामी त्यांची पत्नी माजी पंचायत सामिती सदस्या गंगुबाई यांची मोलाची मदत व साथ लाभल्याचे कोंडीराम यांनी सांगितले. तर कोंडीराम इचके यांच्या हस्तलिखित ग्रंथ निर्मिती करण्याच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची प्रेरणा घेत येथीलच त्यांचे मित्र डॉ. विकास शेटे व सविंदनेचे ८५ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी डी नरवडे यांनी देखील ग्रंथराज ज्ञानेश्वर हस्तलिखीत स्वरुपात निर्माण केली आहे.
      हभप कोंडीराम इचके यांनी हस्तलिखित स्वरूपात दोन ग्रंथांची निर्मिती केल्याबद्दल श्री क्षेत्र गाथा मंदिर देहूचे अध्यक्ष हभप पांडुरंग महाराज घुले,हभप तुलसीराम महाराज सरकटे,हभप डॉ.विकासानंद मिसाळ,वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.आज दि.२२ ला कवठे येमाईच्या इचकेवाडी येथील त्यांच्या वैष्णव सदन वास्तूत ग्राम काका फक्कड जोशी यांच्या हस्ते हस्तलिखित ग्रंथांचे विधिवत पूजन करण्यात आले. या आनंददायी सोहळ्यासाठी  सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब नरवडे,मुलगा श्रीराम इचके सुनबाई अनुजा,मुली विद्या गोरडे,वैशाली गोरडे इचके कुटुंबातील बहूसंख्य सदस्य,नातेवाईक,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *