समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे तीन दिवशीय श्री चारंगबाबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. माळवदे वस्ती, वाळुंज,वागदरे वस्ती परिसरात आयोजित या शर्यतींना पंचक्रोशीतील हजारो नागरिक, शेतकरी व बैलगाडा शौकिनांनी मोठी उपस्थिती लावली.

यात्रा उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बैलगाडा शर्यतींमध्ये विविध गावांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि उत्साही वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.घाटाचा महाराजा चा मानकरी दुर्योधन मामा शिंगाडे हे ठरले
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. प्रथम क्रमांकासाठी ₹५१,००१, द्वितीय क्रमांकासाठी ₹४१,००१ तर तृतीय क्रमांकासाठी ₹२१,००१ चे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच फळीफोड स्पर्धांसाठीही विशेष बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, युवक मंडळे, आयोजक मंडळ तसेच देणगीदारांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवत पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे जतन करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वर्षीही अधिक भव्य स्वरूपात यात्रा उत्सव आणि बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.यावेळी बक्षीस वितरणासाठी शिरूर पंचायत समिती सदस्या कांचनताई राजेश सांडभोर,सुनील वागदरे, गुलाब वागदरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश सांडभोर,आबासाहेब वागदरे, वैभव बच्चे,माजी उपसरपंच उत्तम मामा जाधव, संतोष जाधव,कैलासराव बच्चे,रामदास इचके ग्रा.पं सदस्य,रामदास माळवदे मा.ग्रा. सदस्य, बाळासाहेब जाधव व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वस्तीवरील सर्वच तरुण मित्र मंडळींनी यात्रोत्सव शांततेत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा म्हणून योग्य ते सहकार्य केल्याने यात्रोत्सव व बैलगाडा शर्यती यशस्वी वाशांतेत पार पडल्या.