समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई गावठाणातील घरासमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निखिल गजानन नेवासकर,वय ३३, व्यवसाय – खासगी नोकरी, रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि.पुणे यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार दि. १६ रोजी रात्री १० ते दि. १७ एप्रिल २०२६ सकाळी नऊच्या दरम्यान नेवासकर यांच्या कवठे येमाई येथील राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्याने होंडा कंपनीची सी.बी. युनिकॉर्न मॉडेलची काळ्या रंगाची मोटारसायकल एम एच १२आर जे १५९४ ही दुचाकी चोरी करून नेली. मोटारसायकलची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार पालवे हे करीत आहेत.

Previous Postगाथा व ज्ञानेश्वरी ग्रंथाची हस्त लिखित स्वरूपात ३ वर्षात निर्मिती; कवठे येमाईचे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता कोंडीराम इचके यांचा आगळावेगळा उपक्रम
Next Postटेम्पो,कार,दुचाकीच्या तिहेरी अपघातात एक ठार तर पाच जण जखमी : शिरूरच्या पाबळ-कान्हूर मेसाई रोडवरील घटना
