शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मूळ कवठे येमाई गावचे जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांची आज दि.१२ ला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली आहे.शेटे यांच्या निवडीचे पत्र आज दि.१२ ऑक्टोंबर ला संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा मंच चे राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना साहेब महाराज कापडणीस यांनी दिले. मागील २० वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात सामाजिकतेचे भान ठेवत कार्यरत असणारे व हजारो गरजुंना मदतीचा हात,न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत असलेले जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांच्या निवडीचे संघटनेत स्वागत करण्यात आले.राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न,समस्या समजून घेत ते सोडविण्याचे व संघटनचे कार्य तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा.शेटे अण्णा यांनी निवडी नंतर सा. समाजशील शी बोलताना सांगितले.
जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांची भारत सरकारकडे नोंदणीकृत व आय एस ओ मानांकन प्राप्त असलेल्याअसलेल्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत काल कवठे येमाई येथे सत्कार करण्यात आला. खासदार डॉ.अमोल कोल्हे,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,शिरूरचे आमदार अशोक बापू पवार,माजी आमदार पोपटराव गावडे,संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय सरचिटणीस अमृत ताई पठारे,राष्ट्रीय संघटक किरण वाघमारे,राष्ट्रीय संपर्क प्रमुख डॉ.राजेंद्र हेंद्रे,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय सल्लागार भाऊसाहेब शेळके,राष्ट्रीय सल्लागार नानासाहेब बढे पाटील, राष्ट्रीय मार्गदर्शक आनंदराव पगार,राष्ट्रीय मार्गदर्शक,ह. भ. प.अवचितानंद महाराज, महाराष्ट्र प्रदेश सह संघटक सुरेश आप्पासाहेब गायकवाड,शिरूर तालुका अध्यक्ष सतीश वाखारे,उपाध्यक्ष संदीप भाकरे खेडचे अध्यक्ष अंकुशराव आगरकर,सुमन वाळुंज,वैशाली बांगर,संगीता रोकडे, मलठणचे माजी सरपंच प्रकाश गायकवाड,संपादक पत्रकार प्रा.देवकीनंदन शेटे,कवठे येमाई ग्रामस्थांच्या वतीने शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे,टाकळी हाजीचे सरपंच दामुअण्णा घोडे,अरुणाताई घोडे, सरपंच वर्षाराणी सचिन बोऱ्हाडे,उपसरपंच मधुकर रोकडे,रामदास सांडभोर,सुदाम भाऊ इचके,कैलास बच्चे,राजेश सांडभोर,दीपक रत्नपारखी,सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले,प्रा.विलासराव आंबेकर शिरूर,शांताराम पानमंद चांडोह,जांबुत चे सरपंच दत्ता जोरी,शाळा व्यवस्थापन समिती कवठे येमाई,अविनाश पोकळे,पत्रकार साहेबराव लोखंडे,अरुणकुमार मोटे,आबासाहेब पोखरकर,मारुती पळसकर,प्रफुल्ल बोंबे,पोपटराव पाचंगे,तालुका रेशन संघटनेचे गणेश रत्नपारखी व मान्यवरांनी प्रा.शेटे शेटे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत. तर शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे,जयवंतराव भाकरे,प्रभाकर गावडे,सोनभाऊ मुसळे,दत्तात्रय मुसळे,बाबाजी रासकर व कवठे येमाई ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
-प्रा.सुभाष शेटे – प्रदेशाध्यक्ष,किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटना
– राज्यात असंख्य शेतकऱ्यांना सध्या शेती विषयक,रस्ता,पाणंद रस्ता समस्या,शासन दरबारी शेतीविषयक विविध कामांसाठी सातत्याने मारावे लागत असलेले नाहक हेलपाटे,ग्राम,तालुका,जिल्हा स्तरापर्यंत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली शेतीविषयी ची प्रकरणे शासनदरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरु करण्यात आले असून संस्थापक अध्यक्ष,महासचिव रविंद्र सूर्यवंशी व मंचच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून लवकरच सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे मदत कार्य करण्याची व शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेत स्थान देणार असून लवकरच राज्यस्तरीय जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय,ग्रा मस्तरीय पातळीवर मंच ची संकल्पना पोहचवत सर्वांना सोबत घेत प्रभावीपणे व सनदशीर मार्गाने शेतकरी हिताचे कार्य करणार आहे. ज्यांना या मंच मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी मंच चे महासचिव तथा संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी ,किसान विकास मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार व माझ्याशी संपर्क करावा.