आदर्श शिक्षक विनायक वाळके यांना “टॉप बेस्ट टीचर” पुरस्कार प्रदान

158
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरेवाडी केंद्र -करंदी येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक श्री विनायक वाळके यांना “टॉप बेस्ट टीचर” संपर्क फाउंडेशनव जिल्हा परिषदेच्या कडून प्रदान कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे  शिक्षणाधिकारी श्री संजय नायकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमीन, संजय काळे, गच्चे साहेब, विस्ताराधिकारी श्री मुकुंद देंडगे उपस्थित होते.

जिल्हा परिषद व संपर्क फाउंडेशन तर्फे सुरू असलेल्या स्मार्ट शाळा प्रोग्रॅम अंतर्गत संपर्क टीव्ही  डिव्हाइसच्या माध्यमातून अभ्यासक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबवणाऱ्या शिक्षक व शाळा टॉपर बेस्ट टीचर,  टॉप स्कूल सन 2023 24 यासाठी निवड झाली आहे .यापूर्वी विनायक वाळके करंदी येथे अध्यापनाचे काम करत असताना प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती परीक्षा, ग्रामस्वच्छता अभियान, बाहुली नाट्य असे उत्कृष्ट उपक्रम राबविल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ‘देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. त्यांचा विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग व योगदान असते. त्यांच्या या टॉप बेस्ट टीचर अवार्ड प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माननीय संजय नाईकडे विस्ताराधिकारी मुकुंद देंडगे शिरूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर ,विस्ताराधिकारी वंदना शिंदे, विस्ताराधिकारी किसन खोडदे ,केंद्रप्रमुख गौतम गायकवाड, मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड यांनी अभिनंदन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds