शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम टोकास असणाऱ्या सविंदणे येथील श्री गुरुदेव दत्त विद्यालयात इयत्ता ८ वीत शिक्षण घेत असलेला आर्यन सचिन बोऱ्हाडे याची कबड्डी खेळातील उठावदार कामगिरी लक्षात घेत त्याची १४ वर्ष वयोगटात शासकीय राज्यस्तरीय २०२४/२५ शालेय कबड्डी स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे. आर्यन कवठे येमाईचा असून गावच्या सरपंच वर्षाराणी सचिन बोऱ्हाडे यांचा मुलगा आहे.शिक्षणासाठी तो सविंदणे येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरुदेव दत्त विद्यालयात शिक्षण घेत आहे.
आर्यन ने जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने त्याची राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली.कवठे येमाई ,सविंदणे ग्रामस्थ,शाळेचे सचिव बाळासाहेब लहू पडवळ,प्राचार्या शारदा मिसाळ व सर्वच शिक्षकांनी आर्यन चे अभिनंदन करीत राज्यस्तरीय शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी कवठे येमाईचे माजी उपसरपंच विठ्ठलराव मुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते सचिन बोऱ्हाडे,पांडुरंग भोर,अविनाश पोकळे,बाळशिराम मुंजाळ,शाळेतील शिक्षक उपस्थित होते. तर विद्यालयातील आणखी दोन विद्यार्थी तालुका स्तर स्पर्धेतून जिल्हा स्तरापर्यंत शालेय कबड्डी स्पर्धेत खेळल्याचे प्राचार्या शारदा मिसाळ यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.