युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून मल्हार गडावर स्वच्छता,वृक्षारोपण – आदर्शवत उपक्रमात ५० जणांचा सहभाग 

542
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती फाऊन्डेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक व पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार  संघटनेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील मल्हार गडावर नुकतेच  परिसर स्वच्छता,गाद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या आदर्शवत उपक्रमात संघटनेच्या राज्यस्तरीय महिला पुरुष पदाधिकारी व कुटुंबातील सुमारे  ५० जणांचा सहभाग लाभल्याचे संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अमृतताई पठारे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजीराव शेलार यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले. या स्तुत्य व विधायक उपक्रमाबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय पदाधिकारी हभप नाना महाराज कापडणीस यांनी सहभागी पदाधिकारी,सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.
  काल रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी मल्हारगड येथे युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून मल्हारगड भेट आयोजित करण्यात आली होती. प्रथमतः गडावरील  शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तर डॉ मधुसूदन घाणेकर यांच्या हस्तलिखित अंकाचा  प्रकाशन सोहळा व प्रशस्तीपत्रक वाटप मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. गडावरील महादेवाच्या मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर सामूहिक जेवणाचा आनंद घेण्यात आला.संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष अंकुशराव आगरकर यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सर्व सहभागी सदस्यांचा परिचय व विचार प्रदर्शन घेण्यात आले. युवा क्रांतीच्या ग्रुप वर जाहीर केलेल्या प्रश्नपत्रिका उत्तम प्रकारे सोडल्याबद्दल वसुधा वैभव नाईक व वर्षा नाईक यांना संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजीराव शेलार यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले.
      यावेळी गडावरील स्वच्छता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ.मधुसूदन घाणेकर यांनी आगरकर यांच्या  वाढदिवसानिमित्त सुंदर असे गीत गाऊन तसेच  शिळेवर गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणत उपस्थितांची वाहवा मिळवली.सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजे पर्यंत विविध उपक्रम,कार्यक्रम घेण्यात आले.या उपक्रमात सर्व सहभागी सदस्य व पदाधिकाऱ्यांमध्ये एक अतूट नाते निर्माण झाले. सर्वांचा परिचय झाला त्यानंतर गडावरील कार्यक्रम आटोपून खाली उतरण्यास निघालो. अशाप्रकारे सकाळी दहा ते तीन या वेळेमध्ये वरील कार्यक्रम पार पडले. संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार डॉ, राजेश्वर हेंद्रे या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करतानाच युवा क्रांती फाउंडेशनचा बॅनर तसेच घोषवाक्य लिहिलेले विवध फलक  फलक आणले होते.
 या उपक्रमात संघटनेचे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र शिवाजीराव शेलार, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अमृतताई पठारे,वैशाली ताई बांगर,पल्लवी ताई वाघ, खेड तालुका अध्यक्ष अंकुशराव आगरकर व अनेक वरिष्ठ पदाधिकारी,सदस्य,कुटुंबासह सहभागी झाले होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds