शिरुर तालुक्यासह परिसरातील  १७ जणांनी केले उत्तराखंडातील केदार कंठा शिखर सर

72

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपाद्क) – शिरूर तालुक्यासह परिसरातील म्हसे बुद्रुक टाकळी हाजी,येथील प्रकाश वायसे सदस्य घोड, कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती अध्यक्ष मीना शाखा कालवा यांच्या समवेत शिरुर,वढू बुद्रुक,लोणीकंद,वाघोली येथील १७ मित्रांनी एकत्र येऊन उत्तराखंडातील केदार कंठा शिखर नुकतेच सर करीत भारतीय तिरंगा फडकावला. केदार कंठा शिखर १२,५०० फूट, (३८१०) मीटर उंच आहे. तेथील प्रतिकूल हवामान, पाऊस, बर्फ आणि उंचीवर असणारी ऑक्सिजनची कमी याचा सामना करीत प्रकाश वायसे आणि त्यांच्या टीमने हे शिखर सर केले आहे.
उदय सरोदे,अभिषेक बाफना संजय धुमाळ,वीरेंद्र सावंत,कल्पेश भंडारे,संदीप आरगडे,पवन कंद,मंगेश आरगडे यांच्या सह अनेक मित्रांनी या शिखराचा ट्रेक 40 किमी असताना ही तो तीन दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.ग्लोबल इव्हेंट्स ट्रॅव्हल्स द इंडियन ट्रेकिंग कमोनिटी या कंपनी बरोबर सांक्री (उत्तराखंड) जुडा का तलाब, केदार कंठा बेस कॅम्प, हर गाव कॅम्प मार्गे तेथील बर्फवृष्टी,खराब हवामान आणि ऑक्सिजनची कमतरता यांचा सामना करत हे अवघड शिखर सर केले आहे.
यापूर्वी सातारा तालुक्यातील (वासोटा) जंगल ट्रेक,अहिल्यानगर (हरिश्चंद्रगड), लोणावळा अंबावणे (कोरीगड), मुळशी (घनगड) व (अंधारबन), जुन्नर (आडराई)  अशी अनेक छोटे मोठे ट्रेक धर्मवीर ट्रेकर्स यांनी आत्तापर्यंत सर केले आहेत.  विशेष म्हणजे अंधारबन व आडराई पावसाळी ट्रेक करताना जंगलांचे संवर्धन व जंगल वाढीसाठी बीजरोपण करण्याचे काम व तेथील स्वच्छता मोहीम हाती घेऊन प्लास्टिक घनकचरा व तेथील परिसर सुंदर राहण्यासाठी साफसफाई चे उत्तम काम धर्मवीर ट्रेकर्स टीमच्या वतीने करण्यात आल्याची माहिती प्रकाश वायसे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds