समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे ग्रामपंचायतीस नागरिकांकडून देय असलेली सन २०२४/२५ साठीची करवसुली मोहीम सुरु करण्यात आली असून ग्रामस्थांनी ही ग्रामपंचायतीस देय असलेली घरपट्टी,पाणीपट्टी व इतर कर तात्काळ भरून सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके,विस्तार अधिकारी बी.आर.गावडे,ग्रामविकास अधिकारी स्वप्नील कवडे यांनी केले आहे.
दर वर्षी प्रमाणे आज जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांना ग्रामपंचायतीस देय असलेले कर त्यांचेकडून आज गुरुवार दि.१३ प्रथम भरून घेत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली.ग्रामपंचायत कर्मचारी,बबनराव शिंदे,विकास उघडे यांनी ग्रामपंचायतीतील आपापली कामे सांभाळून ग्रामपंचायतीस जास्तीत जास्त करवसुली होण्याकामी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी दिलेल्या करातूनच आरोग्य,दिवाबत्ती,स्वच् छता,पाणीपुरवठा,कर्मचारी व इतर विकासात्मक कामांवर खर्च होत असल्याने व नागरिकांनी ग्रामपंचायतीस दिलेल्या करातूनच अनेक स्थानिक कामे होत असतात त्यामुळे ग्रामपंचायतीस देय असलेले सन २०२४/२५ साठीचे कर तात्काळ भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी कवडे यांनी केले आहे.