समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूरच्या बेट भागातील मूळ जांबुत गावचे असणारे वरिष्ठ शिक्षक संजयकुमार विठोबा जोरी यांची नुकतीच पुणे येथील डी सी एम सोसायटी संचालित महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल आदमबाग व मुलींचे वसतीगृह सदाशिव पेठ पुणे या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नुकतीच निवड झाली आहे.
संजयकुमार जोरी यांनी यापूर्वी त्यांच्या शिरूर तालुक्यातील जांबुत येथील जय मल्हार हायस्कुल विद्यालयात उपशिक्षक तसेच शिष्यवृती परिक्षा तज्ञ इंग्रजी विषयाचे शिक्षक,महर्षी शिंदे हायस्कुल आंबळे ता. शिरूर, जि. पुणे प्रशालेचे ‘मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट काम केले आहे.जांबुत गावामध्ये ३१ वर्ष शिक्षक म्हणून संजयकुमार जोरी यांनी अध्यापनाचे उत्कृष्ट काम केले.मुलांच्या जडणघडणीत त्यांच्या भवितव्यात शिक्षक आणि शिक्षिकांचा मोठा अन् बहुमोल वाटा असतो, शिक्षक मुलांना घडवताना त्याची ज्ञानलालसा पूरी करतात. शिक्षक मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर घरी, समाजात कसं रहायचं कसं वागायचं काय करायचं, काय करू नये ह्याचा जीवन पाठ देतात. मुलांमधील सुप्त कलागुणांना बाहेर काढतात. त्या गुणांना खतपाणी घालून वाढवतात. विकसित करतात. भावी जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देतात. त्या चिमुकल्या पंखात गरुड भरारी घेण्याचं सामर्थ्य, शक्ती, बळ व आत्मविश्वास जागवतात.असेच विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम संजयकुमार जोरी यांनी केले आहे.
त्यांची पुणे येथे नव्याने मुख्याध्यापक पदी नाइड झाल्याबद्दल डी सी एम सोसायटी ऑफ इंडिया, पुणे चे अध्यक्ष डी टी रजपूत साहेब, जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे, खजिनदार सिद्दार्थ शेवाळे, मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, वर्षाताई पाटील, काजलताई शेवाळे, मा. मंत्री दिलीपराव वळसे पाटील, म्हाडा चे अध्यक्ष मा. खा. शिवाजीदादा आढळराव पाटील, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप,युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील,माजी शिरूर पंचायत समिती सदस्य वासुदेव अण्णा जोरी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चे उप प्राचार्य डॉ. पोटे व तमाम जांबुत ग्रामस्थांनी जोरी यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.