समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ; (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील माळवाडी (भाकरेवाडी) येथे आज दि. २८ ला ५० नागरिक,महिलांना अल्पदरात पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले. येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात या गिरणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा कांती पोलीस मित्र शिरूर टीमच्या वतीने व संघटनेचे तडफदार राज्य पदाधिकारी संदीप भाकरे माध्यमातून व राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्री ताई अहिरे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा क्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय सह संघटक सुरेश अप्पा गायकवाड,राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सुभाष अण्णा शेटे,नाशिकच्या महिला जिल्हा प्रमुख प्रियंका मुरकुटे,माळवाडी चे सरपंच सोमनाथ भाकरे,उपसरपंच साधना गारुडकर लहू भाकरे,तालुका अध्यक्ष सतीश वाखारे,पुणे जिल्हा अध्यक्ष सुदाम रणदिवे,ग्रामसेविका राणीताई रासकर,साबळे,विलासराव गोसावी,युवा क्रांती चे मान्यवर सदस्य,पदाधिकारी,महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी ५० पैकी ५ पीठ गिरण्यांचे महिलांच्या हस्ते पूजन करून प्राथमिक स्वरूपात त्यांचे वाटप करण्यात आले. अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार विरुद्ध लढा देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जात असून गोरगरीब व अडचणीत असलेल्या महिला,भगिनी व सर्वसामान्यांना त्या अडचणीतून दूर होता यावे म्हणून संघटना सातत्याने कार्य करीत असल्याचे प्रतिपादन युवा क्रांतीच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे यांनी केले. तर शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव व्हावी व त्यांना दिलासा मिळावा म्हणून राष्ट्रीय किसान विकास मंच ची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेत सहभागी होन्याचे आवाहन महाराष्ट्र युवा अध्यक्ष तथा राष्ट्रीय किसान विकास मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आवाहन केले. या उपक्रमाची संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,नाना महाराज कापडणीस,मधुकर महाराज अहिरे,आनंदराव पगार,अमृत ताई पठारे,श्रीमती वर्षा नाईक,वसुधा नाईक तसेच माळ वाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे,उपसरपंच साधना गारुडकर यांनी प्रशंसा करीत धन्यवाद दिले. यावेळी सुमारे १०० च्या वर मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी रासकर यांनी केले.