समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – १ जून १९४८ या लालपरीचा जन्म झाला.अहमदनगर (अहिल्यानगर) ते पुणे असा एस टी चा पहिला प्रवास सुरू झाला. शहरी प्रवाशांबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांची लोकप्रिय सार्वजनिक प्रवासी सेवा म्हंजे एस टी बस होय. आणि याच एस टी मध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर आगारात कार्यरत असणारे वाहक मागील १५ वर्षांपासून एसटी अर्थात लालपरीवर निस्सी परम करत प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याचे काम चोखपणे बजावत आहे. खटके यांनी अभिमानाने एसटी च्या आजपर्यंत च्या प्रवासाचे वर्णन करताना एस टी पहिल्या दिवसापासून ती आजपर्यंत अखंडपणे या राज्यभरात, देशाच्या कानाकोपऱ्यात अभिमानाने मिरवते आहे. योगायोग असा की तिच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर महाराणी, राजमाता, राष्ट्रमाता, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्या ३०० व्या जयंतीच्या मुहूर्तावर “श्री क्षेत्र चोंडी ते इंदोर म्हणजे अहिल्यादेवींचे (माहेर ते सासर) असा हा अनोखा प्रवास करण्याचा ऐतिहासिक योग लाल परीला मिळालाय. महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर ते पुणे पहिली एसटी धावली आणि आज याच जिल्ह्याचे नामकरण आता अहिल्यानगर झाले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती व अहिल्याबाई होळकरांचे वंशज.ना.राम शिंदे,आमदार गोपीचंद पडळकर , मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तामामा भरणे, अहिल्या सृष्टीचे शिल्पकार माजी मंत्री अण्णा डांगे, तसेच अनेक खासदार, आमदार, मान्यवरांच्या उपस्थितीत लाल परीचा एक ऐतिहासिक प्रवास सुरू झाला. वाहक गणेश खटके यांच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये या लाल परीचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगतानाच इतर ठिकाणी नोकरीच्या अनेक संधी त्यांना आल्या मात्र नशिबात लाल परीच असावी. १५ वर्षापासून लाल परीचा सेवक म्हणून प्रवाशांना सेवा देतानाच लाल परीवर जीवापाड प्रेम करण्याचे कार्य ते प्रामाणिक पणे करीत आहेत.



बाल वयापासून तसा एसटीचा प्रवास. लहानाचा मोठा आणि शिक्षण या लाल परी मुळेच झाले,तशी ती माझ्या जीवाभावाचीच.असल्याची खटके आवर्जून सांगतात.
अनेक संकटे आली परंतु त्यांची लाडकी लालपरी कधीच थांबली नाही. या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लालपरीचा सिंहाचा वाटा.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या दिमाखात डोलाने डोलत डोलत,मार्ग काढत, लाडकी लालपरी अनेक संकटे झेलत सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचली. सर्वसामान्यांची जीवन वाहिनी, लोकवाहिनी, धमनी म्हणून लालपरीला ओळखलं जातं.
अनेक रूपात लालपरी आजही अखंडपणे प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर
या महाराष्ट्रावर या देशावर आलेली संकट आणि त्या संकटात या लाल परीचा घडलेला प्रवास आजही प्रवासी वर्ग तोंड भरून सांगतो. कोरोना काळ असो वा इतर संकटे असतील एका प्रवाशापासून असंख्य प्रवाशांपर्यंत लालपरी शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत आपलं देखणं रूप दाखवत फिरत असते. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी हे ब्रीद वाक्य घेऊन आजही प्रवाशांच्या सेवेसाठी लाडकी लाल परी अखंडपणे धावते आहे याचा एक कर्मचारी म्हणून खटके सार्थ अभिमान असल्याचे सांगतात.याच लालपरीने महाराष्ट्राला खूप काही दिलं. हजारो डॉक्टर, इंजिनीयर, उद्योजक, मंत्री, आमदार, खासदार, राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, उद्योग तसेच सर्वच क्षेत्रात सर्वांना प्रगतीच्या उंच शिखरावर घेऊन जाणारी, यशस्वी करणारी ही लाल परीच आहे.अनेक जणांनी तिला विसरण्याचा प्रयत्न केला अनेक जणांनी तिच्यावर दगडफेक केली,जाळपोळ केली, तिची विटंबना केली, तिचं प्रचंड नुकसान केलं, स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा वापर केला मात्र ती त्यांच्यावर कधीच नाराज झाली नाही.उलट अनेक संकटांचा धैर्याने सामना करीत अनेक रूपात ती प्रगतीच्या दिशेने धावत असून तिची अनेक रूपे या महाराष्ट्राने पाहिली आहेत. ऊन, वारा, पाऊस, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सन,उत्सव सर्वच कार्यात सर्वांची लाडकी लालपरी नेहमी अग्रेसर असते. ती कधीच थकली नाही, कधी थांबली नाही.आणि थांबणार ही नसल्याचा प्रबळ,अखंड विश्वास वाहक खटके यांनी व्यक्त केला.
अनेक सवलतीं च्या रूपाने अनेक अधिकारी,वाहक,चालक,कर्मचारी याच एसटीने घडवले. सुख: दुःख, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव लाल परीने कधी केला नाही. प्रवासी हे दैवत समजून तिने सर्वांना समान हक्क दिले._
या सरकारचे सुद्धा आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत. कारण या सरकारने हजारो नवीन लालपरी बस त्या महाराष्ट्राचं रूपडं पालटण्यासाठी दिल्या. आज त्या नवीन आकार व रंगात अनेक लालपरी महाराष्ट्राच्या सर्व रस्त्यांवरती, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व महाराष्ट्र बाहेर धावताना दिसतात हा मोठा अभिमान असल्याचे ते सांगतात.