पी एम पी प्रशासनाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांची होणारी लूट तात्काळ थांबवा –  हायलाईट फोरम पुणे चे अध्यक्ष उमेश नाईक यांची मागणी 

समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून महामंडळा प्रति दायित्व व महामंडळाच्या सार्वजनिक उपक्रमात खारीचा वाटा म्हणून महामंडळातील वर्ग क्रमांक एक वर्ग क्रमांक दोन मध्ये कार्यरत सर्व अधिकारी संघटन यांच्या कडून दरमहा रुपये दोन  हजार रुपये तसेच वर्ग तीन व चार मध्ये कार्यरत सर्व कायम अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दरमहा एक हजार रुपये वेतनातून वजावट करण्याचे आदेश पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाने पारित केला असून या आदेशाचा हायलाईट फोरमचे अध्यक्ष उमेश नाईक, उपाध्यक्ष राम तोरकडी, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकत्या श्रीमती वर्षाताई नाईक, संगीता गोसके, दीपक नाईक, अनिता एडके, साहिल नाईक यांनी एका पत्रकाद्वारे कामगारांच्या वेतनातून कमी करण्यात येणारी कपात (वजावट) वसूल करण्याच्या आदेशाचा निषेध केला व अधिकारी कर्मचारी यांची पद्धतशीरपणे होणारे लूट तात्काळ थांबवावी अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
उलट कामगारांना भत्ते व अनुदान स्वरूपात मदत करण्याचे आवाहन उमेश नाईक यांनी यांनी केले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ कर्मचारी कर्मचारी महासंघा बरोबर कुठल्याही वेतन कपाती बाबत त्यांच्याशी चर्चा न करता प्रशासनाने पारित केलेल्या आदेशाचा उमेश नाईक यांनी हायलाईट फोरम पुणे यांच्या वतीने तीव्र निषेध केला आहे.तसे पत्रक हायलाईट फोरमच्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक पुणे शहर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती ही उमेश नाईक यांनी सा,समजातील शी बोलताना दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds