समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील मलठण मंडल विभागा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सोमवार दि. ०४ ऑगस्ट ला मलठण येथील श्री भैरवनाथ मंदिर सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी विलासराव थोरात या होत्या. तर या विभागाचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी आर गावडे,महसूल मंडल अधिकारी विजय फलके,कृषी विभागाचे मंडल अधिकारी अशोक गायकवाड, मलठणच्या ग्राम महसूल अधिकारी मनीषा भालेराव ग्रामपंचायतीचे अनेक मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नागरिकांच्या विविध खात्याअंतर्गत त्यांना जाणवणा-या समस्या,शंका,अडचणी दूर करण्यासाठी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यातील महसूल मलठण मंडळ या ठिकाणी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारे महा छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात मलठण मंडल विभागातील अनेक ग्रामस्थ,महिला,शेतकरी आपल्या अडीअडचणी कागदपत्रांसह घेऊन आले होते. ज्या विभागाशी संबंधित अडचणी,तक्रारी असतील त्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन यावेळी त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिले. या शिबिरासाठी आसपासच्या गावातील महसूल मंडळ मलठणचे अंतर्गत येणारी गावे व अनेक शेतकरी उपस्थित झाले होते. शिबिरास विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळपासूनच उपस्थित होते. प्रत्येक विभागांमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा मार्ग काढण्यासाठी या शिबिरातुन विविध समस्या घेऊन आलेल्या शेतकरी,नागरिक ,महिलांना आश्वासित करण्यात आले. यामध्ये महसूल मंडळ विभागा अंतर्गत येणारे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, पंचायत समितीचे आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महावितरण विभाग, भूमी अभिलेख विभाग, वनविभाग, महिला व बालकल्याण विभाग अशा विविध विभागा अंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. यावेळी ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव कवठे यमाई व त्यांचे इतर ग्राम महसूल सहकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी चेतन वाव्हळ मलठण व त्यांचे इतर ग्रामपंचायत सहकारी, सहाय्यक कृषी अधिकारी नंदू जाधव व त्यांचे इतर सहाय्यक कृषी सहकारी उपस्थित होते.