समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – श्री सदगुरू शंकर महाराज भक्तांचे पहिले अन्नछत्र,श्री सदगुरू शंकर महाराज हेल्थ फौंडेशन,श्री सदगुरू शंकर महाराज मोफत रुग्णसेवा अभियान अंतर्गत गुरुवार दि. ३० ला कार्तिक दुर्गाष्टमी निमित्त पुणे-साता रा रोड, धनकवडी पुणे येथे श्री सदगुरु शंकर महाराज-अन्नछत्र समिती तर्फे मोफत आरोग्य शिबीर,श्रीं चा प्रगटदिन सोहळा,भव्य नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा, मुक्तद्वार महाप्रसाद,होणार असल्याची माहिती,अध्यक्ष राजाभाऊ रेवडे,डॉ.दिनेश रंगरेज यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. गुरुवार दि. ३० ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या या सोहळ्याचे १९ व्या वर्षात पदार्पण होत असून सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत भव्य नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा तर दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत मुक्तद्वार महाप्रसादत्ताचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या निमित्ताने सकाळी दहा ते रात्री नऊ वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे ही आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ७ ते १० भजन आयोजन करण्यात आले आहे, या निमिताने प.पु. सद्गुरू श्री. गणावधुत महाराज,कोल्हापूर यांची सन्मानीय उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सदगुरू शंकर महाराज मठ व अन्नछत्र समिती,मोफत रुग्णसेवा अभियान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दुर्गाष्टमी निमित्त गुरुवार दि. ३० ला होणाऱ्या श्री सदगुरू शंकर महाराज मठ व अन्नछत्र समितीच्या वतीने आयोजित भव्य नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा व मोफत रक्तदान,मोफत आरोग्य शिबिर या विधायक व स्तुत्य,सोहळा उपक्रमाचे युवा क्रांती फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय किसान विकास मंच चे अध्यक्ष नाना महाराज कापडणीस,उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,प्रदेशाध्यक्ष पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे,पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुशराव आगरकर,पुणे शहर कार्याध्यक्ष प्रफुल्ल गवंडी,पुणे शहर अध्यक्ष अनिल रेळेकर,पुणे शहर उपाध्यक्ष समीर नाईक,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा श्रीमती वर्षाताई नाईक,राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष अमृत ताई पठारे,राष्ट्रीय सल्लागार तथा महिला प्रदेशाध्यक्ष वसुधाताई नाईक,व पुणे जिल्हा युवा क्रांती संघटना टीमच्या वतीने स्वागत करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



