समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गावठाणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिवाळी निमित्ताने पाडव्याच्या दिनी नुकताच संपन्न झाला. यावेळी शाळेत १९६० पासून शिकलेले अनेक माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. तर आज पर्यंत याच शाळेतून सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षणाचे बाळकडू घेत विविध क्षेत्रात कीर्तिवंत झाले असून आपल्या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून याच माजी विद्यार्थ्यांकडून शाळेचा शैक्षणिक व सर्वांगीण दर्जा उंचावण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून विविध रूपाने मदत झाल्यास ती दर्जा त्यांचावण्यासाठी नक्कीच महत्वाची ठरेल असा विश्वास शाळेचे केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक सखाराम फंड यांनी उपस्थितांना शाळेच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या गरजा व त्या सुविधांतून शाळेचा होणारा सर्वांगीण विकास व प्रगती ही गावाच्या वैभवात नक्कीच भर टाकणारी ठरेल असा विश्वास सा.समाजशील सोबत बोलताना व्यक्त केला.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव बाळू पोकळे,मिठूलाल बाफना,बाजीराव नाना उघडे,राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत भोर,पांडुरंग भोर,संदीप गायकवाड,सोपानराव वागदरे,व अनेक मान्यवर माजी विद्यार्थी,शाळेतील शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते. यावेळी शाळेत नव्याने आलेल्या ३ शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.जे माजी विद्यार्थी शाळेच्या विकासासाठी किमान ५०० रुपये व त्यापुढे स्वेच्छेने अधिकाधिक मदत करतील त्यांच्या घरातील कोणत्याही पाल्यास शैक्षणिक शुल्क,दाखले,इतर कागदपत्रे विनामूल्य देण्याची घोषणा यावेळी फंड यांनी केली. तर लवकरच या स्नदर्भात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना राबविण्याचा व अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेत त्यांना निमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त योगदान,मदत,शाळेसाठी भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष भरत भोर, मिठूलाल बाफना यांनी आश्वासन दिले.तर याबाबतीत लवकरच माजी विद्यार्थी संघ ही स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



