समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – थोडीशी रक्कम,चिल्लर किंवा वस्तू सापडली तरी उचलून खिशात घालणारे किंवा गपचूप घरी घेऊन जाणारे अनेक महाभाग आपणास पाहावयास मिळतात. पण प्रामाणिकपणाची सवय असलेले अनेक साधी,मनाने स्वच्छ व समाधानी माणसे ही अनेकदा पाहावयास मिळतात.त्याचेच एक सुंदर,आदर्शवत व प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण कवठे येमाई च्या गणेशनगर येथे वास्तव्यास असणारे ६५ वर्षीय शेतकरी पांडुरंग भाऊसाहेब घोडे यांच्याकडून पाहावयास मिळाले.
कवठे येमाई गावातील च तरुण प्रशांत गोपीनाथ कुंभार याचा ४० हजर रुपये किमतीचा मोबाईल रेशनींग भरण्यासाठी गावात पोहचलेले पांडुरंग भाऊसाहेब घोडे यांना त्या दुकानाजवळच रस्त्यावर पडलेला दिसून आला. पण कुठलीही लालसा नसलेल्या घोडे यांनी तात्काळ त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते मिठूलाल बाफणा यांना मोबाईल सापडल्या बाबत माहिती दिली. बाफना यांनी त्यांच्या मोबाईल वरून शोधाशोध केली केली असता तो मोबाईल प्रशांत कुंभार याचा असल्याबाबत खात्री केली. त्याला बोलावून घेत बाफना यांच्या समक्ष तो मोठ्या किमतीचा मोबाईल प्रशांतला परत दिला. घोडे यांच्या प्रामाणिक पणाचे सरपंच मनीषा भोर,समाजशील न्यूज नेटवर्कचे संपादक देवकीनंदन शेटे,मिठूलाल बाफना,दत्ता बाळासाहेब घोडे,किरण मारुती कांदळकर,प्रशांतची आई रंजना कुंभार,गोपीनाथ कुंभार व ग्रामस्थांनी अभिनंदन करीत धन्यवाद दिले. यापूर्वी ही पांडुरंग भाऊसाहेब घोडे यांनी त्यांना सापडलेल्या वस्तू,ऐवज मुळ मालकांचा शोध घेत त्यांना प्रामाणिकपणे परत देण्याचा आदर्श इतरांसाठी ठेवला आहे.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६



