शैक्षणिक क्षेत्रात ए आय वापर या विषयावर शिरूरच्या प्रा. देवकीनंदन सुभाष शेटे यांचे शिक्षकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर शहरातील बाबुराव नगर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालय येथे शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी फिनलँड येथील शैक्षणिक पद्धती तसेच कौशल्य विकास आधारित शिक्षण व ए आय तंत्रज्ञाचा शिक्षण क्षेत्रातील वापर यावर शिक्षणासाठी एका दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संचालिका अमृता घावटे यांनी कौशल्य व विकास यावर आधारित शिक्षण पद्धती यावर मार्गदर्शन केले. शाळेच्या उपमुख्याध्यापिका जयश्री खडसे यांनी फिनलँड येथील शिक्षण पद्धती यावर उत्कृष्ठ मार्गदर्शन केले. तर प्रा.देवकीनंदन सुभाष शेटे यांनी ए आय तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात होणारा वापर याविषयी उत्कृष्ठ मार्गदर्शन करून उपस्थित शिक्षकांना विविध ए आय टूल्स चे प्रशिक्षण दिले. यावेळी संस्थेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, तसेच ज्युनिअर कॉलेज व इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व शिक्षक उपस्थित होते.ए आय तंत्रज्ञांचा वापर करता येणे व त्याचा वापर करून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे असून येणाऱ्या पुढील काळात ए आय तंत्रज्ञान अधिक प्रगत होणार असल्याचे मत यावेळी प्रा.देवकीनंदन शेटे सर यांनी सा. समाजशील शी बोलताना व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या संचालिका अमृतेश्वरी घावटे, सीईओ डॉ.नितीन घावटे, मुख्याध्यापक अभिजीत टकले व अनेक प्राध्यापक,शिक्षक उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds