नारायणगाव येथील आदर्श वीज कामगार ज्ञानेश्वर मेहेत्रे यांचे निधन

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील आदर्श वीज कामगार ज्ञानेश्वर बाबुराव मेहेत्रे यांचे नुकतेच  वृद्धापकाळाने निधन झाले. मेहेत्रे यांनी खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांमध्ये प्रामाणिकपणे सेवा करत असताना सर्वसामान्य माणसांना वीज क्षेत्रामध्ये अतिशय चांगली सेवा देण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला म्हणून जनसामान्यांमध्ये त्यांचे नाव मेहेत्रे मामा म्हणून सर्व परिचित झाले.
ज्ञानेश्वर मेहेत्रे यांनी आपल्या जीवन प्रवासात सामाजिक कार्य म्हणून १९८३ मध्ये वीज कामगार पतसंस्थेची स्थापना करून वीज क्षेत्रातील कामगारांना सहकार क्षेत्रात सहकार्य करण्याचे काम केले. मेहेत्रे यांच्या निधनाने त्यांचे नातेवाईक व मित्र परिवारावर मोठे दुःख कोसळले आहे.शिरूरच्या माळवाडीतील पत्रकार योगेश भाकरे यांचे ते मामा होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली ,सुना नातवंडे असा मोठा  परिवार असून साई समर्थ उद्योग समूहाचे प्रमुख सुजित मेहेत्रे यांचे ते आजोबा होत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds