शिरूरच्या माळवाडीत ५ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह – विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणार सोहळा 

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या बेट भागातील माळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप भाकरे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. या पाचही दिवस महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांची किर्तन सेवा संपन्न होणार असून पहिल्या दिवशी हभप प्रणव महाराज शिंदे (आळंदी),दुस-या दिवशी हभप नितीन महाराज सुक्रे (खडकवाडी),तिस-या दिवशी हभप  पोपट महाराज कासार खेडकर (विदर्भ रत्न),चौथ्या दिवशी हभप बापुसाहेब महाराज बढे( इंदापूर) आणि पाचव्या दिवशी काल्याचे किर्तन गायनाचार्य कविराज महाराज झावरे यांचे होणार आहे.  यावर्षी सप्ताहात  विशेष बदल करण्यात आला असू  सप्ताह मध्ये विना प्रहार आणि किर्तन साथी साठी मंडळातील तरुण नवयुकांनी पुढाकार घेऊन किर्तन साथ व विणा प्रहाराचे काम करण्याचे आश्वासन दिले आहे ही बाब अतिशय विशेष असं कौतुकास्पद असलयाचे भाकरे म्हणाले. सप्ताह कमिटी व मंडळाचे अध्यक्ष नाथा भाकरे,उपाध्यक्ष नवनाथ भाकरे, सचिव राहुल भाकरे, उपसरपंच आदिनाथ भाकरे, देविदास (नाना) भाकरे, युवा क्रांती पोलिस मित्र संघटना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदीप भाकरे यांनी सर्व भाविकांनी या पाच दिवसांत जास्तीत जास्त संख्येने  उपस्थित राहुन या ज्ञान दानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *