NEWS
Search

युवा क्रांती फोंडेशनचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा पुण्यात संपन्न : १२६ गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव : जेष्ठ शास्रज्ञ डॉ.अशोक नगरकर यांची उपस्थिती

380
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – युवाक्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पद्मावती पुणे येथील विणकर सभागृहात संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा नुकताच भव्य स्वरूपात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या पुणे टीम च्या वतीने करण्यात आले. पुणे शहर व जिल्ह्यातील शालेय मुलांच्या सुप्त कलागुणांना आणि कौशल्यांना वाव मिळावा यासाठी त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उदात्त उद्देशाने सुमारे १२६ विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, वक्तृत्व व अन्य कौशल्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांना वाटलेला सार्थ अभिमान हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शास्रज्ञ डॉ.अशोक नगरकर,शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे,हभप नाना महाराज कापडणीस,हभप मधुकर महाराज अहिरे,संचालक नानासाहेब बढे,डॉ. राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय महिला युवती उपाध्यक्षा श्रीमती वर्षाताई नाईक,अमृतताई पठारे,वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे,भाऊसाहेब शेळके,शिवाजीराव शेलार,बाबुराव पवार नांदेड जिल्हाध्यक्ष,भाग्यराम गुजर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष,राणे महाराज उमरखेड,अंकुशराव आगरकर आवर्जून उपस्थित होते. 

याच कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, संशोधन, संघटन, महिला सशक्तीकरण,पर्यावरण,उद्योजकता व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना विशेष सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये जेष्ठ शास्रज्ञ डॉ.अशोक नगरकर,युवा क्रांतीच्या राष्ट्रीय महिला युवती उपाध्यक्षा श्रीमती वर्षाताई नाईक,अमृतताई पठारे वसुधा नाईक, मयूर भागवत,अंकुश आगरकर, शिवाजी शेलार,सुरेश गायकवाड,हर्षलाताई मुलाणी, अनिल रेळेकर, राजू चौधरी, अमित पोमण, अमित तांबे, ह.भ.प. अंजलीताई ढवळे, दीपाली आंबरे, वैशालीताई बांगर, डॉ. राजेश्वर हेंद्रे,निलकंठ गव्हाणे,पल्लवीताई पाटील यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षला मुलाणी,डॉ.हेंद्रे,वसुधा नाईक यांनी तर आध्यात्मिक व वैचारिक मार्गदर्शन ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी केले. कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त मुलांचे पालक,नागरिक,शिक्षक व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– सुभाष शेटे,९९७५६७४२



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds