दुर्गाष्टमी निमित्त उद्या शुक्रवारी श्री सदगुरू शंकर महाराज मोफत रुग्णसेवा अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर व अत्यावश्यक शस्रक्रिया होणार – धनकवडी,पुणे येथील डॉ.दिनेश रंगरेज यांची माहिती  

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – श्री सदगुरू शंकर महाराज भक्तांचे पहिले अन्नछत्र,श्री सदगुरू शंकर महाराज हेल्थ फौंडेशन,श्री सदगुरू शंकर महाराज मोफत रुग्णसेवा अभियान अंतर्गत शुक्रवार दि. १ ऑगस्ट ला दुर्गाष्टमी निमित्त पुणे-सातारा रोड, धनकवडी पुणे येथे श्री सदगुरु शंकर महाराज-अन्नछत्र सामती मोफत आरोग्य शिबीर व विविध आजारांवरील शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती,अध्यक्ष राजाभाऊ रेवडे,डॉ.दिनेश रंगरेज यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५, सायं ५.३० ते ९ हे मोफत आरोग्य शिबीर व अत्यावश्यक शस्रक्रिया शिबीर संपन्न होणार असून अधिकाधिक रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे मोफत आरोग्य शिबीर उत्सव मंडप, श्रींच्या मठाजवळ, ईशान्य सोसा. समोर धनकवडी पुणे यथे होणार असून या शिबिरामध्ये विविध मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत.स्त्रियांचे विकार (मासिक पाळी, बंधत्व, रजोनिवृत्ती), लहान मुलांचे आजार,त्वचेचे रोग व केसांचे विकार / तक्रारी वृद्धापकाळातील आजार विकार – P.C.O.D. P.C.O.S, FISTULA, FISSURES,FIBROID UTERUS, UTERINE CANCER,मानसिक ताण तणावाचे आजार, संधिवात व हाडांचे आजार,पोटाचे विकार व आतड्यांचे विकार मुतखडा व इतर मूत्रपिंडाचे आजार जीवनशैलीशी निगडित रक्तदाब मानदुखी, पाठदुखी, गणवयावरील विकार, रक्ताक्षय दातांमध्ये सिमेंट भरणे,दातांमधील कीड काढणे फिक्स दात बसवणे, कंप बसवणे,कवळी बसवणे, वेड्यावाकड्या दातांची ट्रीटमेंट व  तपासणी – BP. Blood Sugar Level, Haemoglobin, Acupuncture Therapy,बालरोग तपासणी,होमिओपॅथिक उपचार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषोधोपचार, हाडांची घनता तपासणी करण्यात येणार असून याच शिबिरामध्ये विविध मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याचे डॉ. रंगरेज यांनी सांगितले. तसेच नेत्र तपासणी, मोतीबिंदु,काचबिंदू शस्त्रक्रिया, कान नाक घसा शस्त्रक्रिया, तुटलेले हाड जोडणे शस्त्रक्रिया,अवस्कुलर नेक्रोसिस, लहान मुलांचे मूत्र मार्ग शस्त्रक्रिया, किडनी स्टोन शस्त्रक्रिया / प्रोस्टेड ग्रंथी काढणे (ए) सर्व प्रकारच्या हर्निया शस्त्रक्रिया,आतड्याला पीळ पडणे, मूत्र रोग उपचार व शस्त्रक्रिया, हृदयरोग उपचार व शस्त्रक्रिया,अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया,कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी, हृदयाच्या झडपे ची शस्त्रक्रिया,हृदय बायपास शस्त्रक्रिया, हृदय पेसमेकर शस्त्रक्रिया,हृदय अँजिओप्लास्टी,अस्थिरोग आजार व उपचार, त्वचा व गप्तरोग उपचार,रक्ताच्या तपासण्या,डिवाईस क्लोजर,मणक्याची शस्त्रक्रिया,अपंग विकलांग व्यक्तींना कृत्रिम अवयव रोपन,  भेंटव्या शस्त्रक्रिया,दंत तपासणी व उपचार,अस्तिरोग-फॅक्चर, गुडग्याचे लिगामेंट नीट करणे, जन्मत: लखन वाळांची क्लेफ्ट विपपैलेट शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया,रेटिना शस्त्रक्रिया, रिडिएशन,डायलिसिस इत्यादी आरोग्य सेवा,सुविधा,शस्रक्रिया विनाशुल्क होणार असून सर्व गरजू रुग्णांनी या मोफत वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा असे श्री सदगुरू शंकर महाराज मोफत रुग्णसेवा अभियान यांच्या वतीने करण्यात आले आहे.

​       या शिबिरात होणाऱ्या मोफत शस्त्रक्रिया​साठी  ​संबंधित रुग्नाचा अर्ज, महाराष्ट्र राज्य रहिवासी पुरावा​,रेशनकार्ड,आधारकार्ड​ इत्यादी अत्यावश्यक कागदपत्रे सोबत आणावीत असे ही आवाहन करण्यात आले आहे.या मोफत आरोग्य शिबिरात डॉ.दिनेश रंगरेज व त्यांची डॉक्टर सर्व डॉक्टर्स टीम,डॉक्टर्स युनिट चीफ,पुणे सिटी ह्युमन राईटस, श्री सदगुरु शंकर महाराज-अन्नछत्र सामती​ ट्रस्ट वैद्यकीय सेवा प्रमुख उपस्थित राहणार असून या मोफत आरोग्य शिबीरास एन एम रानडे हॉस्पिटल,धोंडूमामा साठे होमीयोपॅथीक मेडिकल कॉलेज,श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,माणिक संजीवनी पुणे यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभणार आहे. या मोफत आरोग्य शिबीरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ट्रस्ट चे अध्यक्ष  राजाभाऊ रेवडे ​यांच्या  ​९​७३३३०५३ डॉ. दिनेश रंगरेज – ​७३८५५२२८६४​ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

   दुर्गाष्टमी निमित्त उद्या शुक्रवारी श्री सदगुरू शंकर महाराज मोफत रुग्णसेवा अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर व अत्यावश्यक शस्रक्रिया​ या विधायक व स्तुत्य उपक्रमाचे युवा क्रांती फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय किसान विकास मंच चे अध्यक्ष नाना महाराज कापडणीस,उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,प्रदेशाध्यक्ष पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा श्रीमती वर्षा नाईक,महिला प्रदेशाध्यक्ष वसुधा नाईक व पुणे जिल्हा टीमच्या वतीने स्वागत करीत अभिनंदन केले आहे.  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *