कोंढापुरी येथे अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सोहळ्याचे आयोजन

समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे ९ आॅगस्ट पासून अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.९ आॅगस्टला सकाळी अभिषेक, कलशपूजन,वीणापुजन, ज्ञानेश्वरी पुजन करून पारायणास सुरूवात होणार आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदीरात शनिवार दि‌.९ आॅगस्ट ते शनिवार दि‌.१६ आॅगस्ट २०२५ या कालावधीत पार पडणा-या अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सोहळ्यात सकाळी ७ ते ११ गाथा पारायण, दुपारी १ ते ४ गाथा भजन, संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ, संध्याकाळी ७ ते ९ हरि कीर्तन, रात्री साडेनऊ नंतर महाप्रसाद, रात्री १० नंतर हरिजागर, पहाटे ४ वाजता काकडा अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून ह.भ.प.प्रताप महाराज चव्हाण,ह.भ.प.गौरव महाराज खेडकर , ह.भ.प.बालाजी महाराज म्हस्के,ह.भ.प.दयानंद महाराज पवार,प्रणव महाराज शिंदे,भरत महाराज शिंदे,ह.भ.प.कबीर महाराज आत्तार यांचे कीर्तनसेवा हरिनाम सप्ताह सोहळ्यात पार पडणार आहे अशी माहिती तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मधुकर जगन्नाथ गायकवाड,माजी संचालक विजयराव ढमढेरे यांनी दिली.

शुक्रवार दि.१५ आॅगस्टला सायंकाळी ४ वाजता ग्रामप्रदक्षिणा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ७ वाजता तुकाराम महाराज गाथा सांगता समारंभ होणार आहे. सायंकाळी साडेसात ते साडेआठ यावेळेत ह.भ.प. कु.भक्तीताई जाधव यांचे प्रवचन होणार असून शनिवार दि‌.१६ आॅगस्टला सकाळी ९ ते ११ यावेळेत ह.भ.प.बिपिनमहाराज कोरडे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. ह.भ.प.सोपानराव गाडगे महाराज हे व्यासपीठ चालक असून   ह.भ.प.गुलाबराव भागुजी गायकवाड,ह.भ.प.दत्तात्रय लहानबा गायकवाड यांच्या वतीने तुकाराम गाथा प्रदान करण्यात येणार आहे. कोंढापुरी येथील सौ.मंगल लक्ष्मण गायकवाड,श्री.लक्ष्मण जनार्दन गायकवाड या दाम्पत्याने हरिनाम सप्ताह सोहळ्याचे औचित्य साधून विठ्ठल- रूक्मिणी मंदीराला स्पिकरसेट भेट दिला असल्याचे श्री.मधूकर गायकवाड यांनी सांगितले. कोंढापुरी येथील पांडुरंग भजनी मंडळ ,कवठीमळा येथील वीर साहेब भजनी मंडळ, खंडाळे येथील हनुमान भजनी मंडळ, गणेगाव भजनी मंडळ,तळेगाव ढमढेरे येथील हनुमान भजनी मंडळ, कवठीमळा येथील श्री संस्कृती भजनी मंडळ, वाघाळे येथील गुरूदेव दत्त भजनी मंडळ, पिंपळे जगताप येथील धर्मनाथ भजनी मंडळ, महादेव वाडी, केंदूर येथील शिवशंभो भजनी मंडळ, कोंढापुरी येथील ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, पांडुरंग भजनी मंडळाचा हरिजागर हरिनाम सप्ताह सोहळ्यात पार पडणार आहे असे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मधुकर जगन्नाथ गायकवाड ,माजी संचालक विजयराव ढमढेरे यांनी सांगितले.
अति गतीने,अधोगतीच्या मार्गाने भरकटत चाललेल्या अस्थिर समाजाला स्थिरता यावी ,मानवी जीवनात संसार ,दु:खाची निवृत्ती, मोक्षाची प्राप्ती करून देण्याची कीर्तन,भजन, नामस्मरण हाच एकमेव राजमार्ग आहे.हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ब्रम्हांडनायक भगवंताच्या कृपाप्रसादाने व संत महात्म्यांच्या आशिर्वादाने समाजामध्ये प्रेम, बुद्धी, सहिष्णुता सात्विकता, बंधूभाव निर्माण होतात.प्रत्येकाने सुसंस्कारक्षम , बलशाली , स्वावलंबी बनावे या उद्देशाने या हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन कोंढापुरी ग्रामस्थांनी केले असल्याचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मधुकर जगन्नाथ गायकवाड,माजी संचालक विजयराव ढमढेरे यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *