या भागाचा अधिकाधिक विकास,प्रगती साधायची असेल तर ना.दिलीप वळसे पाटील यांच्याशिवाय शिवाय पर्याय नाही – जेष्ठ नेते सुधीरभाऊ पुंडे 

259
शिरूर पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई व पंचक्रोशी चा अधिकाधिक विकास करायचा असेल,आपल्याला जर आणखी प्रगती पथावर जायचं असेल तर ना.वळसे पाटील यांच्या शिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक जेष्ठ नेते सुधीरभाऊ पुंडे यांनी व्यक्त केले आहे. ते ना. वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ कान्हूर येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी वळसे पाटील समर्थक,नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी वळसे पाटील साहेबांचे उत्स्फूर्तपाने स्वागत करण्यात आले.
 2009 सालापासून आपली ४२ गावे आंबेगाव विधानसभा मतदार संघास जोडली गेली. आतापर्यंत साहेबांच्या तीन टर्म यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून ही त्यांची  चौथी टर्म आहे. मला सांगायला अभिमान वाटतो मी याच्या अगोदर देखील माजी आमदार पोपटराव गावडे साहेब असतील माजी आमदार बाबुरावजी पाचरणे असतील यांचा देखील विकास कामांचा झपाटा पाहिलेला आहे.  परंतु त्यांच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये पाच लाख आले चार लाख निधी आला तरी आपल्या खूप मोठा आनंद व्हायचा. आमच्या भागामध्ये 2009 पासून तुमचा मतदारसंघ आमच्या जी काही गाव तुमच्याकडे 42 जोडले गेलेले आहेत तुमचा जो काही विकास निधी आहे हा लाखात आम्ही कधी ऐकला नाही . तर हे आकडे ऐकल्या नंतर गेल्या पंधरा वर्षांमध्ये आपण जवळजवळ 100 कोटीची रुपयांच्या पुढे विकास कामे आपल्या भागामध्ये केलेली  आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्याकाळात चार लाख दोन लाख रुपयांच्या निधीची कामाचे आकडेवारी ऐकली तर आमचा उर भरून यायचा परंतु काय झालं कोणास ठाऊक वळसे साहेबांच्या माध्यमातून कान्हूर परिससरात अनेक कामे होऊन देखील काही लोकांना आनंद होत नाहीये. नक्की काय घडतंय काय चुकतंय तेच काही कळायला मार्ग नाही. मागील काही महिन्यात ना.वळसे पाटील यांच्या  मार्फत आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून पुंडे,गावडे वस्ती करीता आम्ही आणि मानसिंग पाटील यांनी सामूहिक प्रयत्न करून त्या रस्त्या करता ६० लाख रुपयाचा निधी आणला ते काम होत असताना आम्ही वस्तीवर लोकांना विनंती करतो की ते विकास काम करत असताना ते काम मंजूर करताना किती यातना आणि कोणा कोणाला भेटून काय कसं समजून सांगावे लागते आपण देखील त्या काम करताना विनंती राहील की आपण दोन दोन पावलं पुढे या तो रस्ता सगळ्यां करता आहे सगळ्यांचा त्यात देखील भवितव्य जोडलेला आहे रस्ता चांगला झाला तर तुमच्या वस्तीला किंमत वाढणार आहे.  म्हणून सर्वांना विनंती करतो कुठेही वाद विवाद न घालता आपण विकास तर पाहिजे आपली जमीन पण नाही गेली पाहिजे हे लक्षात घेत सर्वांना विनंती आहे की सहकार्य करा चांगलं काम होईल अशीच खूप काही काम सांगण्यासारखे आहेत 15 वर्षापूर्वी साहेब मी पाहिलेपासून हा जो रस्ता आहे या घाटामध्ये दत्तू तात्याला पण ट्रॅक्टर वर या रस्त्याने ट्रॅक्टर नेताना त्याकाळी किती त्रास होत होता  आज तुम्ही पहा जगातील कोणततीही स्टार गाडी घेऊन या यारस्त्याने न्या विनासायास टी हा घाट लीलया चढून जाते. साहेबांच्या पुण्याईमुळे खरे तर या परिसरातील रस्त्यांची खर्या अर्थाने चांगली सुधारणा झाली आहे. कान्हूर-सविंदणे रस्ता, कान्हूर – कवठा रस्ता, कान्हूर – शिक्रापूर रस्ता, कान्हूर,मांदळवाडी रस्ता असेल  परिसरातील अनेक रस्ते चांगल्या प्रमाणात झाल्याने दलन वळणाच्या दृष्टीने आता अधिक सोईस्कर झाले आहे. याचे सर्व श्रेय ना.वळसे पाटील यांनाच जाते. विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे काही ठिकाणी गाडी रस्ता असतो तिथं गटार भरावा झाला हे काम न संपणार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की जे काही स्थानिक मतभेद,मतभेद असतील ते  आपण आपल्या जवळच ठेवूयात आपल्या जर आपल्या भागाचा अजून जोमाने विकास साधायचा असेल सातत्याने भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर आपले नेतृत्व ही सक्षम असायला पाहिजे.  आपल्याला जर आपल्याला अधिकाधिक प्रगतीला जायचं असेल तर यापुढे ही नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या शिवाय पर्याय नसल्याने येत्या २० तारखेला घड्याळाच्या चिन्हाचे बटन दाबून वळसे पाटील यांनाच विजयी करा असे आवाहन ही सुधीरभाऊ पुंडे यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds