शिरूर पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई व पंचक्रोशीत शिरूर आंबेगाव चे भाग्यविधाते ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टी व कुशल नेतृत्वातून भरगोस विकासकामे झाली असून संकट काळात कान्हूर मेसाई ग्रामस्थांना ना.दिलीपराव वळसे पाटील यांची वेळेवेळी मदत मिळत असल्याने सर्व सामान्य कान्हुरकर जनता वळसे पाटील यांनाच मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन बंडूशेठ पुंडे,माजी सरपंच,कान्हूर मेसाई यांनी केले. ते ना. वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी वळसे पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बंडूशेठ पुंडे म्हणाले कि, या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन काही घरांची वाताहात झाल्याची माहिती मिळताच ना. दिलीपराव वळसे पाटील प्रथमतः या ठिकाणी आले. आणि आपत्तीग्रस्त गोर गोरिबाला आधार,मदतीचा हात देण्याचं मोठं काम वळसे पाटील यांनी त्यावेळी केलं. त्यावेळी मानसिंग भैय्या पाचुंदकर पाटील, प्रकाश बापू असतील नेतेमंडळीनी या ठिकाणी येऊन मोठा आधार दिला. यावेळी नाराज ग्रामस्थांना उद्देशून बोलताना पुंडे पुढे म्हणाले कि, तुम्हाला तुमच्या मनात तरी काही शंका असेल स्पष्ट बोला चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो. उद्याच्या निवडणुकीमध्ये साहेबांना आपल्या 39 गावांमध्ये बहुमत कसं मिळेल या प्रश्नावर आपण शक्यतो बोलावं आणि साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा हीच भूमिका या ठिकाणी सांगत असताना पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींना सांगतो येत्या 20 तारखेला साहेबांच्या नावासमोरील घड्याळाचे चिन्ह आहे त्या वळसे पाटील यांच्या नावासमोर जे बटन आहे ते दाबून साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करत असल्याचे आवाहन बंडूशेठ पुंडे यांनी उपस्थितांना केले.