विनोद तावडे च्या उपस्थितीत किसन कथोरे यांनी भरला विधानसभेचा उमेदवारी अर्ज

समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी आज शक्ति प्रदर्शन करत भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे, मध्यप्रदेशच्या खासदर कविता पाटीदार, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रमोद हिंदूराव, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मेहबून पैठणकर, आशिष दामले, राजेश पाटील, उल्हास बांगर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुरबाड कुणबी समाज सभागृहापासून शहरातून छत्रपति शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्प गुच्छ अर्पण करून जाहीर सभा घेत शक्ति प्रदर्षण केले. या वेळी उल्हास बांगर यांनी मागील निवडणुकीत राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येऊनही मंत्री पदाला हुलकावणी दिली याची खंत व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमोद हिंदूराव यांनी महायुतीच्या विकासाच्या मुद्द्यावर सरकार मध्ये आलो विकासाच्या नावाने किसन कथोरे यांना प्रचंड मतांनी विजयी करू अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड माझी कर्म भूमी असून, महायुतीच्या सरकारमुळे मुरबाड- बदलापूर बदलत आहे. मी मुरबाडसाठी लागेल तेवढा निधी आणला पण ठेकेदार बनलो नाहीं. आपल्या समोरचा उमेदवार ठेकेदार असून, माझा संघर्ष विकासाशी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खास करून उपस्थित राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी जमलेला गर्दीला आवाहन केले की, कथोरे यांना सव्वा दोन लाख मतांनी विजयी केल्यास राज्यात महायुतीचे सरकार आल्यास मंत्री पद नक्की देणार असे आश्वासन दिले. महाविकास आघाडी गद्दारी बाबत बोलतात पण 2019 ला उध्दव ठाकरे यांनी गद्दारी केली, तर लाडकी बहीण योजना बंद करणार नसून, बंद करणाऱ्यांना पाडा असे आवाहन केले. व कथोरे यांनी केलेलें शक्ति प्रदर्शन पाहून गर्दी वाढली, टाळ्या वाजल्या की उमेदवार जिंकतो अस नसते कारण अबकी बार चारशे पार चे परिणाम आपणं भोगले असल्याचेही त्यांनी सूचित करून गाफील न राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या शक्ति प्रदर्शनामुळे महाविकास आघाडी हि कामाला लागली असून सुभाष पवार यांनीही शक्ति प्रदर्शनाची तयारी सुरू केल्याचे मुरबाड विधान सभेत काटेकी टक्कर पहायला मिळणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *