समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रात अग्निमुक्त वन दिनानिमित्त जनजागृतीसाठी विशेष शपथ विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री. रामलिंग देवस्थान सभागृह, शिरूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.या कार्यक्रमासाठी वन अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच पोलीस पाटील यांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिरूर वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वन हे पाणी, माती, हवामान आणि वन्यजीवांचे संरक्षण करणारे महत्त्वाचे साधन असून, त्यावर अनेकांच्या जीवनाचा आधार आहे. मात्र वन वणव्यामुळे काही क्षणांत मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते. त्यामुळे हा शपथ विधी केवळ औपचारिक न राहता, वनसंवर्धनासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरावा,असा उद्देश या उपक्रमामागे आहे.ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण करून वन वणवे रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतः पुढाकार घेऊन इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिरूर वन परिमंडळ अधिकारी भानुदास शिंदे यांनी केले आहे. तसेच सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपली जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

अग्निमुक्त वन दिनानिमित्त शिरूर रामलिंग मध्ये शपथ विधी कार्यक्रमाचे आयोजन
BySamajsheel NewsMarch 20, 20260
Previous Postशेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी करणे महत्वाचे : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ७ फायदे ; ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव यांचे आवाहन
Next Postशिरूर पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक पिकांचे नुकसान, महसूल,कृषी विभागाकडून पंचनामे वेगाने सुरू
