NEWS
Search

शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी करणे महत्वाचे : शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ७ फायदे ; ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव यांचे आवाहन 

150

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी (E-Crop Survey) ही अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर योजना ठरत असून मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच आपल्या पिकांची नोंद करता येते यामुळे अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचत असते.ई पीक पाहणी केल्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ७ फायदे मिळणार असल्याने शिरूर तालुक्यातील कवठे येमाई,मुंजाळवाडी,इचकेवाडी परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी तात्काळ इ पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन कवठे ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव यांनी केले आहे.
  ई-पीक पाहणीचे प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत 
शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईलद्वारे पीक माहिती भरल्याने अचूकता वाढते,पीक नोंद असल्यामुळे अनुदान, पीकविमा आणि सोलर योजनांचा लाभ लवकर मिळतो,शेताची माहिती,पीक व क्षेत्र यांचे अधिकृत रेकॉर्ड तयार होते,पीक नोंदणी झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होते, कुठेही बसून मोबाईलवरून माहिती अपडेट करता येत असल्याने वेळ आणि खर्च वाचतो, जिल्हा व राज्य पातळीवर कोणते पीक किती क्षेत्रावर घेतले आहे, याचा अचूक अंदाज शासनाला मिळतो, हवामान,उत्पादन आणि बाजार यांचा अंदाज घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरते,यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *