गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून पुन्हा केरोसीन वितरणाची मागणी – कुटुंबास कीं ४ लिटर मिळणे गरजेचे : सोमनाथ वचकल 

109
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर तालुक्यात सध्या घरगुती गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कवठे यमाईसारख्या मोठ्या गावातही गॅस उपलब्धतेचा प्रश्न गंभीर होत चालला असून अनेक गृहिणींनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी अडगळीत पडलेल्या जुन्या लाकडे,ऑइल वर शेगड्याही वापरात आणल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर शिधापत्रिका धारकांना रास्त भाव दुकानामार्फत पुन्हा केरोसीन (रॉकेल) उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पुणे जिल्ह्याध्यक्ष सोमनाथ वचकल यांनी सा.समाजशील शी बोलताना शासनाला आवाहन केले आहे कि,शहरी व ग्रामीण भागातील गॅस टंचाई च्या पार्श्वभूमीवर प्रती कुटुंब किमान ४ लिटर केरोसीन ते ही सवलतीच्या दरात तात्काळ उपलब्ध करून द्यावे.तर शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील गणेश कुंभार, दिनकर इचके, फक्कड वामन सांडभोर, मच्छिंद्र बोराडे, जयसिंग जालिंदर इचके, कैलास फटांगडे, बेबीताई कुळके, प्रतिमा काळे,अमोल डोरके,प्रकाश पळसकर आदी लाभार्थ्यांनी केरोसीनचा स्वयंपाकासाठी वापर करण्यास तयारी दर्शविली आहे.
गणेश रत्नपारखी : शिरूर तालुका अध्यक्ष रेशनदुकानदार संघटना 
“प्रत्येक अडचणीच्या काळात शासनाला हक्काने आपल्या सर्वांची आठवन येते परंतु मागील पाच ते सहा महिन्यापासुन कमिशन नव्हते त्या वेळी कुणाचीच काही गडबड नव्हती इतर हि अनेक प्रसंगांत आपला नेहमी विसरच पडतो राज्यात कोविड च्या साथीने जवळपास 150 रेशन दुकनदार मृत्यूमुखी पडले त्या वेळी आपण शासनाचे कुणीहि नव्हतो त्यामुळे आपल्याला हि हे ठरवून घ्यावे लागेल शासनाला विचारावे लागेल जेवढ्या हक्काने अडचणीच्या काळात आमची आठवन काढता त्याच हक्काने मायेने आमच्या कडे आमच्या कुटुंबाकडे पहा काही मोजकीच उदाहरणे रेशन कार्ड ला लाभार्थ्यांचे आधार लिंक करणे मोबाईल लिंक करणे मयत स्थलांतरित व्यक्ती शोधून देणे सर्वच डाटा अद्ययावत करून देणे कोविड काळात जीवावर उदार होऊन. महिन्याचे दोन दोन वेळा धान्य वाटप करणे एस टी एन टी लाभार्थी डाटा देणे असे आणि इतर असंख्य विषय आता युद्धाचा भडका उडालेला असताना केरोसीन देण्या साठी आपली आठवन झाली फक्त केरोसीन परवानाधारक जगले की मेले हे कुणीही विचारत नाही”.
        दरम्यान, शिरूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेशराव रत्नपारखी यांनी सांगितले की, अनेक लाभार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर केरोसीन हा पुन्हा एक पर्याय म्हणून आवश्यक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ शिधापत्रिका धारकांना केरोसीन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गॅस वापराला पर्याय म्हणून केरोसीनवर स्वयंपाक करण्यासाठी लागणारी ईलेक्ट्रिक शेगडी किंवा तत्सम उपकरणे अनेक नागरिकांकडे उपलब्ध आहेत.परंतु चुलीवर स्वयंपाक करताना लाकडे पेटविण्यासाठी,अडगळीत पडलेले स्टोव्ह वापरण्यासाठी केरोसिनचा नक्कीच वापर करता येणार असून ग्रामीण भागातील अनेक दुकानातून स्टोव्ह,केरोसीन वर चालणारी उपकरणे सध्या उपलब्ध जरी नसली तरी मागणी आल्यास नक्कीच उपलब्ध करू अशी माहिती कवठे येथील व्यापारी रविकिरण (पपूशेठ) नेवासकर,राकेश बोरा यांनी दिली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *