शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सन 2024/25 दिव्यांग बांधव यांना प्रत्येकी 34972 रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी शिक्रापूर नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, उषाताई राऊत, ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिनकरराव कळमकर, ग्रामदैवत भैरवनाथ ट्रस्टचे सचिव अर्जुन भाऊ शिर्के, मचे सर, कुदळे, युवा उद्योजक दीपक शेठ भुजबळ , मोहम्मद भाई तांबोळी प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच सर्व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल तीस लाखांच्यावर दिव्यांग निधी वाटप करण्यात आला. दिव्यांग निधीचे वाटप करत असताना सर्व दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचे शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले.