शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापुर येथील भैरवनाथ मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक पार पडली. शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे उपनिरिक्षिक अश्विनी सानवणे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिनकरराव कळमकर, अर्जुन शिर्के, गुरुवर्य बाबुराव साकोरे, पुजारी बाळासाहेब शेंडे, लक्षण भुजबळ, सुदाम कळमकर, कोठारी भंडारी यांच्या सह अंदाजे १५० जण उपस्थित होते. बैठकीतला मार्गदर्शन करताना उपनिरिक्षक सोनवणे यानी सांगितले कि, जेष्ठ नागरिक संघासाठी पोलिस स्टेशन यांच्या माध्यमातुन पाहिजे ती मदत केली जाईल. तर जेष्ठ नागरिक संघासाठी भाविष्यात कसलीही कमतरता भासू दिली जाणार नसून, जेष्ठ नागरिकांच्या इमारतीचा प्रश्न, तसेच ज्या नागरिकाना चालण्यासाठी ञास होत असेल त्याना भार पेलवण्यासाठी काठ्या देण्यात येतील असे गडदे याना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले. अध्यक्ष कळमकर यांनी जेष्ठ नागरिकांनी सदस्य होऊन सभासद फी जमा करावी असे सांगितले. मासिक बैठक ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.