समाजशील न्यूज नेटवर्क,शिरपूर,धुळे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या शिरपूर तालुका टीमच्या वतीने संघटनेचे महाराष्ट्र युवा सचिव गिरिष प्रकाश मोरे व शिरपूर तालुका सदस्य मयूर माणिक चौधरी यांनी नुकतेच शिरपूरमधी रामसिंग नगर परिसरात असलेल्या रेशनिंग दुकानात भेट दिली. संबंधित शासकीय रेशन दुकानाकडून शिधापत्रिकाधारकांवर होणारा अन्याय, व सर्व सामान्य ग्राहक,गरीब जनतेची होत असलेली पिळवणूक पाहून दुकानदाराला या बाबत जाब विचारला, रेशन दुकानदार जनते सोबत अन्याय करत होता,लोकांना दिवस भर बसवून ठेवत पूर्ण धान्य देत नव्हता,या बाबतची माहिती युवा क्रांतीच्या शिरपूर टिम ला कळली,काही वेळातच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या रेशन दुकानदाराचा खरपूस समाचार घेतला,संबंधित दुकानदाराने आपल्या पदाधिकाऱ्यांना विचारना केली असता त्यांनी त्याच्या हातात युवा क्रांतीचे ओळखपत्र दिले. ते पाहून त्याची पूर्ण गडबड झाली त्याने तात्काळ आपल्या शिरपूर पदाधिकाऱ्यांना विनंती केली कि या पुढे मी कोणताही विलंब न करता शिधापत्रिका धारकांना जे काही शासन मान्य अन्न धान्य मिळते ते सर्वांना वेळे वर व तत्पर सेवा देण्याची खात्री दिली.



जर या पुढे माझ्या रेशनदुकानातील तुमच्या कडे माझी कुठलीही तक्रार आली तर तुम्ही रीतसर योग्य ती कारवाई करू शकता. ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच मला एक संधी देण्याची विनंती केली. संबंधित रेशन दुकानदार वठणीवर आल्याचे पाहून मोरे यांनी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष,महासचिव रविंद्र सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून सदर दुकानदारास योग्य ती समज देण्यात आली. या पुढे जर तुमच्याकडील शिधापत्रिका धारकांची पीळवणूक झाल्याचे दिसून आले तर युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.या वेळी तेथे काही महिला भगिनी,ग्राहक होत्या त्या सर्वांनी मोरे,चौधरी व युवा क्रांतीची खूप कौतुक केले. युवा क्रांती संघटनेचा सर्वांनी नारा दिला. शिरपूरचे मयूर माणिक चौधरी हे गेल्या १५ दिवसा पूर्वीच युवा क्रांती संघटनेत सदस्य म्हणून सहभागी झाले आहे. एक तत्पर समाजसेवक म्हणून मयूर लागलीच हजर असतो, उपस्थित ग्राहकांनी मोरे व चौधरी यांना असेच सतत समाजाच्या अडचणीच्या वेळी उपयोगी या अशा शुभेच्छा देतातच संघटनेचे हे काम च असल्याचे विनम्रपणे त्यांनी सांगितले. जिथे अन्याय,अत्याचार, भ्रष्टाचार दिसेल तिथे युवा क्रांती उभी दिसेल.आज शिधापत्रिका ग्राहकांना न्याय मिळवून दिला यात आत्यंतिक समाधान झाल्याचे मोरे यांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले. ही ताकद आहे युवा क्रांतीची,आपल्या संघटनेची,अध्यक्ष रवी भाऊ सूर्यवंशी यांच्या सुंदर मार्गदर्शना मुळे हे सर्व शक्य होत आहे,त्यांना कधी हि कॉल केला,त्यांचा फोन व्यस्त असेल तर परत कॉल ते करून आस्थेने चौकशी,मार्गदर्शन करतात.
संघटनेचे महाराष्ट्र युवा सचिव गिरिष प्रकाश मोरे व शिरपूर तालुका सदस्य मयूर माणिक चौधरी यांनी केलेल्या या कौतुकास्पद कार्याबद्दल संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना साहेब महाराज कापडणीस,राष्ट्रीय मीडिया प्रमुख मार्गदर्शक,राष्ट्रीय किसान विकास मंच चे वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे प्राचार्य किसनराव रत्नपारखी,राष्ट्रीय सरचिटणीस अमृत ताई पठारे, महाराष्ट्र महिला अध्यक्षा वसुधाताई नाईक,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष वर्षाताई नाईक,महिला जिल्हा प्रमुख मीनाताई गवारे, रणदिवे मॅडम राष्ट्रीय संपर्क प्रमुख डॉ.राजेंद्र हेंद्रे,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय सल्लागार भाऊसाहेब शेळके,राष्ट्रीय सल्लागार नानासाहेब बढे पाटील, राष्ट्रीय मार्गदर्शक,आनंदराव पगार,राष्ट्रीय मार्गदर्शक,ह. भ. प.अवचितानंद महाराज,पुणे जिल्हा अध्यक्ष सुदाम भाऊ रणदिवे,शिरूर तालुका सह कार्याध्यक्ष पंकज सावंत,खेडचे अध्यक्ष अंकुशराव आगरकर यांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.