समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एक अग्रगण्य व नामांकित असलेली पुणे जिल्हा परिषदेच्या कवठे येमाई केंद्र शाळेतील इयत्ता ५ वि ची विद्यार्थिनी कुमारी अंशिका अशोक फसले हिने नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून ती जवाहर नवोदय विद्यालय येथे प्रवेश पात्र ठरली असल्याची माहिती शाळे चे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक सखाराम फंड यांनी दिली.
कु.अंशिका अशोक फसले हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचा व शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ संचालक जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांची युवा क्रांती फाउंडेशनच्या राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख मार्गदर्शक पदी व त्यांना नुकताच दैनिक संध्याचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल आज गुरुवार दि. २७ रोजी जि. प .प्राथमिक शाळा कवठे यमाई येथे या दोघांचा ही सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यानिमित्ताने यशस्वी विद्यार्थिनीअंशिका फसले,पत्रकार सुभाष अण्णा शेटे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती शिल्पा बाजीराव गावडे यांचा देखील शाळा व्यवस्थापन समिती,शाळेतील शिक्षक व पालक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ग्रामीण भागातील कवठे येमाई शाळेची विद्यार्थीनी कु.अंशिका अशोक फसले हीने मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे,शिरूर तालुका गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर,कवठे शाळा केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक सखाराम फंड,अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ कवठे येमाई यांनी कु.फसले हिचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

पत्रकार शेटे अण्णा यांना दैनिक संध्याचा मिळालेला आदर्श पत्रकार पुरस्कार व त्यांची युवा क्रांती फाऊंडेशनच्या राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख मार्गदर्शक पदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक,अध्यक्ष महासचिव रवी भाऊ सूर्यवंशी,राष्ट्रीय पदाधिकारी हभप नाना महाराज कापडणीस,नानासाहेब बढे,डॉ.राजेश्वर हेंद्रे,शिवाजीराव शेलार,अमृत ताई पठारे,मीनाताई गवारे,वर्षाताई नाईक व अनेक सदस्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.