समाजशील न्यूज नेटवर्क, धनकवडी,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे धनकवडीच्या पुण्याईनगर मधील लेन नंबर एक, दोन तीन आणि चार मधील नागरिकांना जाणवणाऱ्या विविध समस्यांकडे कोणी लक्ष देईल काय ? असा संतप्त सवाल युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती वर्षा नाईक व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला होता याबाबतीत सा.समाजशील न्यूज नेटवर्कने वास्तव व सविस्तर वृत्त दिले होते. त्याचा चांगलाच परिणाम होऊन तेथील नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी आता बऱ्या पैकी दूर झाल्या आहेत.त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून खास करून पुण्याई नगरमधील रहिवासी व महिलांकडून युवा क्रांतीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई नाईक यांचे व समाजशील न्यूज नेटवर्कचे विशेष अभिनंदन होत आहे.


धनकवडीच्या पुण्याई नगर परिसरातील रहिवाशांनी मिळून खूप वेळा रहदारीस व रहिवाशांना अडचणीचे ठरत असलेले मंडपाचे साहित्य पसारा काढण्याबाबत विनंती केली होती. परंतु या बाबत व तो परिसर स्वच्छ राहावा म्हणून टाळले जात असल्याचे पाहावयास मिळत होते तसेच येथील लेन नंबर चार मध्ये याच बांबूमुळे जे पाईप फुटले होते ते त्या लोकांनी स्वतःच्या पदरचे चार हजार रुपये खर्च करून दुरुस्त करून घेतले तसेच लेन नंबर चार मधील त्रिमूर्ती अपार्टमेंट मधील मागील दोन महिन्यांपासून टेरेसवर असणारी पाण्याची टाकी लिकींएज झाल्याने तेथील अनेक रहिवाश्यांच्या घरात पाणी येत होते. ही बाब नागरिकांनी श्रीमती वर्षा नाईक यांना सांगताच त्यांनी तात्काळ प्लम्बर बोलावत दुरुस्ती करून घेतली. धनकवडी,पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या युवा क्रांतीच्या श्रीमती वर्षा नाईक हे करीत असलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी व धनकवडीच्या पुण्याई नगर परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.