समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ; (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – न्हावरे ता. शिरूर जि पुणे या गावचे हद्दीत तळेगाव ढमढेरे ते न्हावरे रोडने संदिप महादेव सरके यांचे घराशेजारी काल दि. २३ ला रात्री साडेसातच्या दरम्यान स्विप्ट व कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात तीन ठार,एक गंभीर जखमी झाल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली. तर या अपघाताबाबत रविंद्र महादेव सोनवणे वय 38 वर्षे व्यवसाय शेती रा कुटेवस्ती, न्हावरे ता शिरूर, जि. पुणे यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. तर या अपघातातील आरोपी कंटेनर ट्रक नं. एन एल 05 जी. 2396 वरील अज्ञात चालक नाव गाव माहीत नाही हा कंटेनर्स पळून गेला आहे.
या भीषण अपघातात कैलास कृष्णाजी गायकवाड वय 49 वर्षे, गौरी कैलास गायकवाड वय 20 वर्षे रा निवाळकर वस्ती, न्हावरे ता शिरूर जि पुणे,गणेश महादेव नेर्लेकर वय 23 वर्षे रा. कोकणगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर हे मयत झाले असून दुर्गा कैलास गायकवाड वय 45 वर्षे निबाळकर वस्ती न्हावरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघाताबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रविवार दि 23 रोजी रात्री 19.30 वा चे सुमारास मौजे न्हावरे ता. शिरूर जि पुणे या गावचे हद्दीत कैलास कृष्णाजी गायकवाड हे त्याचे ताब्यातील पांढरे रंगाची स्वीप्ट कार गाडी नं. एम.एच.16 सी. व्ही. 4176 मध्ये त्याची पत्नी दुर्गा कैलास गायकवाड मुलगी गौरी कैलास गायकवाड व चुलत मेव्हणे गणेश महादेव नेर्लेकर यांना बसवून ते वाघोली पुणे येथून न्हावरे कडे येत असताना ते तळेगाव ढमढेरे ते न्हावरे रोडने संदिप महादेव सरके यांचे घराशेजारी रोडवर आल्यावर समोरून न्हावरे बाजूकडून तळेगाव कडे जाणारा कंटेनर ट्रक नं एन. एल. 05 जी 2396 वरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील कटेनर अविचाराने, हयगयीने, निष्काळजीपणाने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जोरात चालविल्याने समोरून येणारे स्वीफ्ट कारला जोरात धडक देऊन अपघात करून अपघातात ३ ठार तर एक जण गंभीर झाले आहेत.या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान करण्यास कारणीभूत ठरलेला कंटेनरचालकअपघाताची खबर न देता पळून गेला आहे. पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोते करीत आहेत.