NEWS
Search

सुभाष पवार यांच्या साठी माजी आमदार गोटीराम पवार मैदानात ; महायुतीला धक्का देण्यासाठी मोठे शक्ती प्रदर्शन

564
समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी शक्ति प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना सुभाष पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदार संघातील कल्याण मुरबाड बदलापूर येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून महाविकास आघाडी चे शक्ति प्रदर्शन केले.
सुभाष पवार यांना पहिल्यांदा विरोध करणारे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सुभाष पवार यांना निवडून आणणे हा शरद पवार यांचा आदेश असून, तो आम्हाला बंधनकारक असल्याचे सांगत विजया ची खात्री दिली. तर माजी आमदार गोटीराम सुभाष पवार यांच्यासाठी मैदानात उतरले असल्याने त्यांना मानणारा व 2009 चा पराभवाचा बदला घेण्यासाठी गोटिराम पवार यांचं कार्यकर्ते सज्ज झाल्याचे पहायला मिळाले. मात्र सुभाष पवार यांनी महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्यावर घणाघात करतांना सांगितले, की मी जरी ठेकेदार असलो आणि तुमचा सामना ठेकेदारा शी असला तरी आपणही जंगल ठेकेदार होतें हे सर्व मुरबाड कराना माहीत आहे. मुरबाड मतदार संघाचा विकास झाला असे म्हणत असाल तर निवडणूकी पुर्वी नारळ का फोडावे लागलें, बदलापूर मुरबाड मधील अनेक समस्या प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अनेक वक्त्यांनी लाडकी बहिण योजनेवर बोलताना निवडणूकी पुर्वी पैसे देऊन महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर महागाई च्या माध्यमातुन या महिलांना दिलेले पैसे पुन्हा वसूल केले जात असल्याचे वक्त्यव्य केले. यावेळी व्यासपीठावर रविंद्र चंदणे, कविता वारे, संतोष विशे, चेतनसिंग पवार, जयराम मेहेर, कालिदास देशमुख, नितिन देशमुख यांनी महा विकास आघाडीची भूमीका मांडली मात्र खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) या वेळी उपस्थित रहाणार नसल्याचे सर्वत्र बोलले जात असताना त्यांनी उपस्थिती दाखवल्याने महाविकास आघाडी व महायुती यांच्यात काटे की टक्कर पहायला मिळणार आहे. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds