समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आयोजित साविञी प्रतिष्ठानच्या वतीने कोर्स केल्याबद्दल २२ महिलांना प्रमाणपञाचे “धाडस ” च्या उपसंपादिक मनिषा राजगुरु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महिलांना रोजगार मिळावा या अपेक्षेने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे राजगुरु यांनी सागितले. या वेळी २२ महिलांना प्रमाणापञाचे वाटप करण्यात आले. संचालिक जयश्री कोळोखे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पांडुरंगाची मुर्ती देऊन राजगुरु यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक महिलांनी आपआपली मनोगते व्यक्त केली. शशीकला प्रजापती, ज्योती चव्हाण, सोनाली शिरोळे, रेणुका पन्हाळकर, राणी चक्रनारायण, आशा काळे, सोनाली पवार, मृणाल राऊत यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पवार यानी केले. यावेळी काजल जाधव, मनिषा नाईकोडी, अनुष्का धोंडे, प्रियका ढोकले, स्नेहल कोठवळे, स्वाती गायकवाड, अन्य उपस्थित होते.