समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कारंजावणे येथील ॲड.राहुल सुरेश वाळके पाटील यांची त्यांनी दिव्यांगप्रती व सामाजिक क्षेत्रात सुरु ठेवलेल्या उत्तम कार्याची दखल घेत त्यांची नुकतीच प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. राहुल वाळके यांनी विविध सामाजिक कामे करत दिव्यांग बांधवांसाठी विशेष कार्य केले असून प्रहार कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष, जिल्हा उप ध्यक्ष इत्यादी पदांवर उत्कृष्ट काम केले असून त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ॲड. राहुल वाळके यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड
BySamajsheelJuly 23, 20250
Previous Postमलठणचे नानाभाऊ फुलसुंदर शिरूर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी
Next Postकवठे येमाईत चोरट्यांकडून बी बियाणांचे दुकान फोडले - सीईटीव्ही केले लंपास - रोख रकमेसह एक लाखांची चोरी - शेजारील कपड्याचे दुकान ही फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी